पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्वीता-२. (३७) निश्चय हा मग ते चि ते होउन बुद्धि हि पणा न धरी ।। सिंधुसि सैंधव वि मिळे तरि येइल गोष्ट वदों दुसरी ॥ ६५ ।। ज्यास नसे मन वश्य अवश्य तया प्रति बुद्धि हि जाण असेना ।। तो चि अर्युक्तं न इंद्रिय आधिन स्वस्वरुपात्मक ध्यान घडेना । ध्यान जया न घडे गुरुसेवन जीवन शांति तया गवसेना ।। शांति नसे मग मोक्षसुखा अधिकार कधी न दिसे मति-हीना ।। ६६ ।। नावरण करणे विषयों मन त्याच सर्वे भवतें बहु धांवे ।। . लंपट होउनियां भटके सुटका चि नसे भ्रम दुर्घट पावे ।। बुद्धि हरे अवघी अवधी उडिदांत बिजातिस काय पहावे ॥ सागरिं नाविक वीण तिरी संमिरी सुटली भलतीथ वहावे ॥ ६७ ।। यास्तव जो करि हे कुरुनंदन निग्रह इंद्रिय-सर्व-कळा ।। नेमुनियां विषयी मन पूर्वक बुद्धि रमे स्वरुपी अचळा ॥ तज कळो म्हण शोधुनियां गुज युक्ति जुन्या कथिल्या समुळा ॥ प्रज्ञप्रतिष्ठित दाखविले रुप पाह करातळिंचा अवळा ॥ ६८ ॥ ज्ञाननिशीत भुते विषयी जन सुप्त तई मुनि जागति ऐसे ॥ इंद्रियनिग्रह जे करिती निज बुद्धिस आत्म-पदी जडले से ॥ जागति सर्व भुते मुनि नेणति हे सहजा निशि त्यां प्रति भासे ।। जे निशाचर हि नेणति भानुस आणि दिवाचर रात्रिस जैसे ॥ ६९ ॥ हे विषयी जन आणि मुनीजन भोगाविशीं समसे दिसती ।। अंतर काय असे तरि आइक दोन्हि हि पावति कोण गती या इकडे भरती सरतां पण सर्व जळे उदधी मिळताती संत तसे निज शांतिस पावत आणि अहर्निशि कां मरती ॥ ७० ॥ टाकुनि काम समस्त मनींहुनि निस्पृह वर्ततसे मुनि जो कां . यत्न कदा न करी विषयार्थ चि मौन धरी भय येशचि धोका ।। निर्ममता निरहंकृति निर्मुळ पूर्णपणे असकाचि अशंका ॥ देव-वशे अनुकूल स्विकारित शांति सुखासानं तो अवलोका ।। ७१ ॥ या परि ब्रह्मस्थिति दृढ बाणत आयकिली कुरुनंदन! कानी । इंद्रिय-अर्थ मिळे करणा परि बद्ध नव्हे सहसा विषयांनी ॥ ६२ या चरणांत दोन अक्षरें कमी आहेत. ६३ अयुक्त योगरहित. ६४ करणे इंद्रिये. ६५ तरी नौका. ६६ समिर-वारा. ६७ झण=म्हणून. ६८ गुज-गुह्य. ६९ या चरणांत एक अक्षर कमी आहे. ७० करण=इंद्रिय.