पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवडीता-२. कोण घडीस घडे समयोग असे जरि ऐकासि तरि ऐके जे समयीं ममतास्पद मोहक बुद्धि तरे उतरे असके ।। देह मि हा अभिमान विसर्जुने अर्जुन ! चूकसि सर्व अशंके ।। ते समयीं पहातां तुज सार्थक काय अकारण जाणुनि शोके ।। ५२ ॥ बुद्धि तुझी श्रुति अर्थ विचारुनि सांडुनि लौकिक निश्चळ होतां ।। मी परब्रम्ह समाधि च या परमात्मरुपी दृढता स्थिर चित्ता ॥ लागें तई विषयादिक नासति भेद भुती वठतां समचित्ता ।। योग असा तरि पाळिसि निश्चित हे चि करी सुख-साधन पार्था ।। ५३ ।। अर्जुन वीनवितो गुरु श्रीपति ! निश्चळ बुद्धिस कोण म्हणावा ।। त्याच परी स्थितप्रज्ञ असे कवणा म्हणिजे बरवे समजावा ।। राहतसे परि कवणे परि वर्तत संशय हा मनिचा निरसावा ।। श्रांत बहु श्रमलों भवसागरिं सांपडला तव पाय-विसांवा ॥ ५४ ॥ टाकुनियां इह स्वर्ग-सुखादिक काम मनी वसती तितुके ॥ आपण आपुलिया अवलोकुनि आत्मरुपी परमात्म-सुखें ॥ तुष्ट सदोदित त्यास म्हणों मुनि याच सुखी वसती हरिखे ॥ प्रज्ञप्रतिष्ठित दाखविले रुप देव म्हणे बरवें स्वमुखे ॥ ५५ ॥ होत जरी बहु दुःख तरी पण किंचित मात्र उदासिन नोहे ।। सौख्य अपार घडे परि ज्यामानं हर्ष-स्मृहाँदिक हेतु न राहे ॥ काम-विषाद-भयादिक-वर्जित आवरिले मन दृश्य न पाहे ॥ त्यास म्हणों स्थितधी मुनि त्वां पुसिले तरि आइक सावध तूं है ॥५६॥ पुत्र सखे घर दार धनादिक यावरि स्नेह कदापि न बैसे ॥ पर जे अनुकूळ स्ववृत्तिस ये शुभ प्राप्त जरी तरि कांहिं न हर्षे सर्व प्रतीकुळ ती अशुभे भिनली निज वृत्तिस सर्व अशेषे ॥ निदि च ना म्हण प्रज्ञप्रतिष्ठित त्यास असे कथिजे षिकेशे ॥ ५७॥ जेवि प्रभा रवि अस्तुस घेउनि जाय तसे विषया करणे * ॥ घेउनि आत्मरुपी निघतां उरला चि न भोगिजे ती कवणे ।। ज्या परि सहरती कैमठे जाश पादकरादिक आवरणे ॥ त्या पुरुषा प्रति प्रज्ञप्रतिष्ठित जाण अवश्यक हे म्हणणे ॥ ५८॥ २९ विसर्जून टाकून. ३० बरवें=चांगले. ३१ परि-रीत. ३२ हरिखें-हर्षानें. ३३ प्रज्ञप्रतिष्टित-स्थिर झाली आहे बुद्धि ज्याची असा. ३१ स्पृहा इच्छा. ३५ हृषिकेश हृषिका + ईश-इंद्रियजयीकृष्ण. ३६ अस्तुस अस्तास. * करणे इंद्रियाने. (करण साधकतम क्षेत्रगानेंद्रियेषुच). ३७ संहरती आंखडतात. ३८ कमरें कांसवें.