पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-२. हो सुख यावरि दुःख घडो तरि अंतरि ज्या सम ही बिघडेना लाभ अलाभ घडे सहज स्थितिने म्हणं हर्ष अमर्ष पडेना ।। यो जय नातरि दुर्जय या परि धीर कुळेोचळसा उपडेना तूंहि असे रित युद्ध करी मग पाप कुठे तुजलागि जडेना ।। ३८ ॥ सांगितली तुज सांयमती निज निर्गुण निष्क्रिय नीज निजात्मा आणि स्वधर्म हि सांगितला अनुकूळ अवश्यक जो निजकर्मा ।। दोहिंस ही ऑदिकारण बुद्धि च तो परिसे मंति-योग सुवर्मा बुद्धिस मीसळतां सहजे सकळा सुटिजे दृढ बंधन-वर्मा ।। ३९ ।। आचरितां निज कर्म घडे क्रमसिद्ध समग्र हि सांग जयाने न्युन्य कदाचित होय न जाणत दूषण आचरल्याने ॥ भक्षण श्रीतुळशी पळती करितां बहु रोग फळे सुकृताने स्वल्प श्रमें बहु हा तरिजेल महा भवसिंधु-समंधुपदाने ॥ ४० ॥ ते चि तुं ऐकसि ही जरि एक करी निज बुद्धि स्वभावस्वरूपी जो व्यवसायि परात्पर-निष्ठ तसा चि तुं होउनि हो अनुतापी ।। जे बहु कामुक आचरती निगमासन अंतमनोरथ-पुप्पी अव्यवसायि तया म्हणिजे सुख किंचित पावत ना ते कदापी ॥ ११ ॥ हे कुरुनंदन तो अविश्चित निश्चळ व्याकुळ दुश्चित चित्ते वेद फळे वदला इह स्वर्ग-सुखादिक भोग अपेक्षित त्यातें ।। बाळक निंब न घे म्हण माउलि साखर दाखविताहे तयातें याहुनि थोर नसे म्हणती परि जाणति ना ते निजात्म-फळाते ॥४२॥ आणिक ही बहु संपति भोगुनि नित्य क्रिया बहुला असती काम-फळे इह स्वर्ग-सुखादिक जन्मुनि कर्म-गती मरती ।। ते चि पुन्हा मग आचरती परमोत्तम इच्छनि हे चि गती सांडुनि बारिक तांदुळ आदर तूंष दिवानिशि पाखडती ॥ ४३॥ भोग भंवीं विभवादिक संभ्रम या चि भ्रमे भ्रमले मन ज्याचे भोग तसे परमोत्तम भूषणभेद भुती करिं भाग्य तयाचें ।। पापि तया म्हणताति अकिंचने जो न भजे फळ स्वर्ग-कतूचे या परि अल्प नसे चि समाधि हि आरत फार च पुष्पित वाचे ॥४४॥ १०० ह्मण-हह्मणून. १ अमर्ष=राग. २ कुलाचल-मुख्य पर्वत. ३ सांख्य-मति ज्ञानबुद्धि. मति-योग-ज्ञामयोग.५ वर्म-कवच. ६ अविपश्चित-मूर्ख. ७ह्मण ह्मणून. ८ बहला-पुष्क ळ. तष कोंडा. १० भव संसार. ११ विभव=ऐश्वर्य. १२ अकिंचन-दरिद्री. १३ आरत= आवड. १४ पुष्पित वाचा-कामुकजनास फल-प्राप्ति होईल असें अभिवचन देणारीवेद-वाणी.