पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-११२. (२७) नदि च पिंड कधी पितरां जळ लोपत पिंड-क्रिया अवघी ॥ ४२ ॥ दोष विशेष तया कुळ-घातकियास अशास कुलघ्न म्हणावा कारण जो वरुणा शिवशंकर तो नर पाप-पुरूष गणावा ।। जाति + स्वार्थ हि बूडविला अणि तो कुळधर्म हि नाहिं च ठावा शाश्वत धर्म उलंघुनि सर्व हि फार अधर्म करीत उठावा ।। ४३ ।। सांडुनि लौकिक धर्म अणी कुळधर्म हि सांडुनि दे अनयासे जातिस्वधर्म हि सांडुनियां भलते च अधर्म करीत प्रयासे ।। तो करि वास महा नरकी श्रम दुर्घट पावत पाप-प्रकाशे हे मुरु-मर्दन ! कृष्ण ! जनार्दन ! सांग सविस्तर संशय नासे ॥ ४ ॥ पाप महत्करणार असे अम्हि जातिकुळाधम नष्ट अधर्मी ।। राज-सुखादिक लोभ चि मानुनि झालो प्रवर्तक संगर-कर्मी ।। स्वजन मारुनि आठवणे कुळनिर्मळवंश + + परधर्मी ।। भ्रष्ट कुलस्त्रियाँ होतिल या वरि कोण प्रसिद्धि हि क्षत्रिय-धर्मी ॥ ४५ ॥ मी जंव या रथिं आहे अशस्त्र चि तोवरि त्या धृतराष्ट्र-सुताने ।। घेउन शस्त्र करें शिर छेदुनि घेउन कां न वजाँय सुखाने । हा उपकार किमर्थ करी न च होइल क्षेम मि जाइन प्राणे ।। त्रासभरे अति श्वास हि टाकित व्याकुळता शरिरा प्रति बाणे ॥ ४६॥ संजय सांगत या परि अर्जुन बोलुनियां रथं ते च घडी ।। टाकुनियां शरचाप सगद्गद नोत्रिं च वाहत नीर-झडी ॥ मौन्य बसे भ्रमे भान नसे मन शोक-समुद्रिंचे ऐले थडी॥ विव्हळ होत धनंजय ते दळिं बोधिल या वरि कृष्ण गडी ॥ ४७॥ । अध्याय २ रा. सांगत संजय तेथ धनंजय व्याकुळ होय तये समयीं अश्रु-जळे भरले स्थुळ नेत्र हि चित्तिं विषाद कृपा हृदयीं ।। ऐकुनियां वचने मधुसूदन सावध त्या करिताहे उपायीं। उद्धव चिद्धन संत-जना प्रति वीनवितो मतिशुद्ध सवायी ॥१॥ श्री-यश-ज्ञान-विरक्ति-उदार जगत्रयिं एक असा भगवंत बोधितसे म्हणतो अरे अर्जुन ही विषयी करुणा अनुचीत ।। कमल आणिक कीर्तिस नाशक घालित नेउनियां नरकांत १८ वजाय जाय. १९ क्षेमकल्याण. ५० नीर उदक. ५१ ऐल-आलीकडचो. ५२ करमल-मूर्छा.