पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगतगीता -१. (२५) कोणि दुजे न दिसे चि तया प्रति सूहृद या दळि त्या दळिं पाहे बंधुसमे दिनबंधुसि वंदुनि शंकित रंकैपरी वदताहे ॥ २७ ॥ घात कुळाप्रति होत अशी मनिं ये करुणा कृपया पर जाला सद्गद कंठ हि कुंठित बोलत झेडु च त्या प्रति दाटुनि आला ।। कृष्ण कृपाघन श्रीमधुसूदन स्वोजन सर्व हि सैन्य-द्वयाला युद्धमिषे समसिद्ध रणीं तरि कारण श्रीहरि कुळक्षयाला ।। २८ ॥ गात्र बहू शिणले शरिरी मम होति कळा पडताति पिळे वाळत तोड खडा रसने प्रति शुष्क पॉणी तयाँसी न मिळे ।। पाह किं आंग हे थार्थर कांपत इंद्रिय दाहतसे अनळे रोम उभारत कंठ + या तनु ताप तिन्ही दिसती स्वलिले ॥ २९ ॥ शक्ति अशी क्षिण झालि हरी करिं गांडिव हे उचलो न शके दहिं धडाडित अग्नि तया परि दाह अधीक चि हो भडके ।। जीव सले कढवे न उठावत पाय गळोनि गती वसके भ्रामत हे मन मोहित होउन भ्रांतिभ्रमें करुं काय कसें ॥ ३० ।। हे जगदीश निमित्त दिसे मज हे विपरीत किं केशवराया! काय ययांतुनि श्रेय निघे तरि व्यर्थ चि द्वेष धरूं मनिं वायां । फार कठोर असा मग होउनि सांडुनि लौकिक सूहृद-माया मारुं यया स्वजनाासि जनार्दन हे मुरुमर्दन वंदित पायां ॥ ३१ ॥ इच्छि च ना जय राज्यसुखादिक भोग भवीं विभवा न मनी ।। जीवित ही क्षणभंगुर जाणुनि कां विपरीत करूं करणी ।। वैभव हे बहु मेळवुनी सुत्दांस विभागुनि देति जनी ॥ त्यां प्रति मारूनि वैभव मेळवू काय अधीक वदे वदनीं ॥ ३२ ॥ ज्यां करितां बहु राज्य-सुखादिक मेळवुनी व्यय सर्व करी ।। ते चि उभे धनप्राण विसर्जुनि दुष्ट सुयोधन साह्यकरी ॥ त्यां प्रति मारुनि राज्य कसे करुं पाहिल कोण सुदृष्टिभरी ।। जे इकडे तिकडे विर दीसात आप्त च भासात प्राणपरी ॥ ३३ ॥ दोहिं दळी विर लाक्षत अर्जुन तो चुलते गुरु आणिक आजा । वैर परस्पर घेउं जयीं विर वीरॅश्रिने परिणीत चिमाजा ।। मातुळ सासुर पुत्र सपौत्र हि गोत्रज हे मिनले रण-काजा । होइल निश्चय निक्षय सर्व हि जे मिनले नृप युद्ध-समाज ॥ ३४ ॥ ३९ रंक भिकारी. ४० झेंडु-तोंडापुढे फेंस येतो तो. ४१ अनळे - अग्नीने. ४२ मुरुमर्दन-मुरु-दैत्य-हंता. ४३ परिणीत विवाहित. ४१ मिनले मिळाले.