पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवदगीता-१. (२३) भरि भयंकर गोमुख उंबर शंग अणी केहळा सदटे ।। साह्य धरापति ते हित ये रिति वाद्य चि वाजात जे न तुटे एकसरे उठला अति तुंबळ नाद जणूं अवकाश फुटे ।। १३ ।। या उपरी मग श्वेत रथी हय श्वेत नियोजुनि सज्जुनि सेना माधव पांडव एक रथी महती सम आणिक कांहिं दिसेना । शंख महा धरि हो उभया करि सायुध सिद्ध उभे वदवेना वाजविती निज शंख महा विर कोणि कुणा प्रति तेथ पुसेना ॥ १४ ॥ वाजवि पांच जिअन्य रमाधव अर्जन वाजवि देवदत्तू। पौडू विदध्महि शंख भयंकर भीम बळे मग वाजवितू ।। हे त्रय शंख दणाणित ते क्षणिं सात हि क्षोहिणि त्यांत कयूं मुख्य महीवर शंख पुरस्सर ते हि परीकर ऐकसि तूं ।। १५ ॥ नाम अनंत जया विजयो करि घेउनि हर्षित वाजवि राजा नाम युधिष्टिर धर्मपरायण घोष करी अरि-कंदन-काजा ॥ माद्रि-सुता सहदेव नकूळ हि शंख सुघोष करी घनगाजा तो मणिपुष्पक घे सहदेव हि थोरलिवर वाजत बाजा ॥ १६ ॥ काशिपती अणि वीर महा राथ नाम शिखंडि जयासि पहा धृषटद्युम्न हि शंख चि वाजवि गाजवितो रणश्वास महा । राव विराट विराटक वाजवि कर्कश तो पर सैन्य दहा हो अपराजित वाजवि सात्यकि शंखरवाकुल होत अहा ॥ १७ ॥ द्रौपद-आदि-करोनि धरापति वाजविती निजशंख मुखें। द्रौपदिचे सुत पांच महा बळि ते स्फुरिती निज शंख सुखें । तो अभिमन्यु महाभुज वाजवि शंख बळे हरिखें। घोष महा रण-कर्कश वाजत शंख पहा पृथके पृथके ॥ १८ ॥ भरि सयानक शंख भयानक हो भय-दायक घोष असा नाद सणाणित मेरु दणाणित तो रण मानित दाहि दिशा ।। क ल्लोळ तुंबळ होत धरातळ तो नभ-मंडळ या परिसा तो हृदयासि विदारुनि कौरव मानितसे मनिं योग कसा ।। १९ ।। युद्ध-व्यवस्थित पुत्र तुझे स्थित पाहुनि कौरव-सैनिक सारे २० भेरी-नोबती. २१ कहला=नगारे. २२ अवकाश-आकाश. २३ पांचजिअन्य= पांचजन्य (कृष्णाच्या शंखाचें नांव ) २? देवदत्तू देवदत्त (अर्जुनाच्या शंखाचें नांव ) २५ पौंड-शंखविशेष भीमाचा. २६ अनंतविजय-धर्माचा. २७ सुघोष-नकुळाचा २८ मणिपुष्पक-सहदेवाच्या शंखाचें नांव. २९ स्फुरिती-वाजविती. ३० हरिखें हर्षाने.