पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१. (२१) जो प्रपितामह वेदविधी वरुणेंद्र हि रुद्र मरुद्गण सारे स्तोत्र मुखें करि दिव्य स्तुती गित गात हि सांग च साम तसारे । ध्यात ऋषी मुनि योगि हि पाहात नेणति कोणि सुरासुर बारे तोचि सचिद्घन उद्धव वंदित देव दयाघन पूर्ण कृपा रे ॥१९॥ अध्याय पहिला. प्रश्न पुसे धृतराष्ट्र कुरूपति धर्म करी निज क्षेत्र दळाचे कौरव ही अकरा दळ क्षोणि हि या कुरु क्षत्रिंच वीर वळाचे ॥ एकवटोनि । युयुत्सव मानुनि मामक कौरव पांडव साचे काय कसे करिती वद संजय या वरि तो वदतो निज वाचे ॥१॥ पाहुनि पांडव-सैन्य-विभू दृढ राव सुयोधन जो गुढबुद्धि श्रीगुरु द्रोण-रथा निकटी मग येउनिया शिरि पाउल वंदी ।। जोडुनिया कर किंकर त्यापरि बोलत वाक्य परायण बुद्धी ते तुजला कथु गुह्य सविस्तर सावध बैसुनि ऐक त्रिशुद्धी ॥२ ।। पाह म्हणे गुरुवर्य कृपानिधि पांडव-सैन्य-विभू रण-रंगी राचियले दळ बेथिल तेथ चि फार भयंकर युद्ध-प्रसंगी । जो द्रुपदात्मज शिष्य तुझा गुढ सैन्य-पती तिकडे हरि-संगी यद्ध-विशारद शुद्ध 'मनी + + बुद्धि मतांत हि श्रेष्ठ निसंगी ।। ३ ।। वीर तयादळिं धीर पराक्रमि भीम धनंजय या परि पाडे काळ कृतांत हि सन्मुख पाहनि साधिती जाउनि युद्धनिवाडे ।। तो युयुधान विराट महारथ द्रपद-पुत्र सभे तव चाडे साह्य सुसैन्य तयादळि आणिक सांगत आइक ते सुरवाडें ॥ ४ ॥ आणिक त्या प्रति साह्य धरापति युद्धसमागति आइक आतां तो धृष्टकेतु हि आणि चेकीतॉन काशिपती बळवीर्य पहातां ।। + यं ब्रह्मा वरुणेन्दरुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवै वेदैः सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः । ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः ।। १ ।। युयुत्सव युद्धोल्लास. १३ मामक-माझे (पुत्र.) १४ विशारद-कुशल.१५ मनों' या शब्दापुढील दोन अक्षरे आम्हांस उपलब्ध झालेल्या पोथींत नाहीत हैं दाखविण्याकरितां दोन फुल्या घातल्या आहेत. पुढेही जेथें जितकी अक्षरें कमी असतील तेथे तितक्या फुल्या घातल्या जातील.