पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिल्हण-चरित्र. राजा विचार करि होइल ब्रह्महत्या । स्त्री घात-पातक घडे सहसा निमित्या ।। कन्या ऽपिजे निजकरे कवि बिल्हणासी दोघे जणे वसुत देइन वित्त त्यांसी ॥ ११५ ॥ श्री बिल्हणासि मग नेउन वीरसेनें। पाचारिलो शशिकला विधली विधाने ॥ ग्रामें परें धन दिले यश वाढवीले । धूर्तासि विठ्ठल* ह्मणे परिपूर्ण जाले ॥ ११६ ।। समाप्त ____* हा विठ्ठल कवि बीड शहराजवळील गोरीपूर येथील राहाणारा. हा जातीने ऋग्वेदी ब्राह्मण असून त्याचे गाव कौशिक होते. तो छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळी होऊन गेला असे त्याच्या ग्रंथांतील अंतःप्रमाणावरूनच. सिद्ध होते. ह्याचे मुख्य ग्रंथ 'सीतास्वयंवर' व 'रुक्मिणीस्वयंवर' हे होत. दोन्ही नानावृत्तबद्ध आहेत. 'बोले विठ्ठल हा पदार्थ उगवा षण्मासचा वायदा' असे झणून श्लोकबद्ध कूट रचणारा हाच विठल. होय. ह्याची उपदेशपर पदें ही पुष्कळ प्रसिद्ध आहेत. रुक्मिणीस्वयंवरांत व सीतास्वयंवरांत त्याणे आपला थोडकासा वृत्तांत दिला आहे तो येणे प्रमाणे : आनंदाद्वकशालिवाहन शके षट् नंद बाण क्षमा १५९६] मासांचा नप मार्गशीर्षक महा बोले कवी सत्तमां ॥ श्रीमत्कौशिकगोत्र वस्ति नगरी गौरीपुरी जाणिजे ॥ मुख्यस्थानक बीड नीड़तरफे मध्ये नृपे राहिजे ॥ श्रीमद् रूक्मिणिचे स्वयंवर निकै संपूर्ण हे वाचिजे ॥ ऋग्वेदोत्तम आश्वलायन महाशाखांबुधी जाणिजे ॥ वर्णी विठ्ठल दुग्धःसागर-कलालंकार-चूडामणी । पद्ये प्राकृत सप्तसर्ग तिनशे त्रेपन्न चिंतामणी ॥ ऋग्वेदोत्तम आश्वलायन महा शाखा कवीची असे ॥. वस्तीचे स्थल बीड त्या तळवटी गौरीपुरी पै वसे ॥ जाणा कौशिक गोत्र त्यासि भजणे श्रीराघवा कारणे ॥ सीतेचे रचिले स्वयंवर जना कल्याण हो मी लणे ।।