पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विठ्ठल कृत. अद्यापि ते नृपसुता रतिभोगकाली। प्रेमादरे करयुगें धरि कंठनाली ।। दंतोष्ट-पीडनक्षते क्षतभाव दावी । ते मी स्मरे मदनमंदिर-देवदेवी* ॥ १०८ ॥ अद्यापि ते वरवधू सुभगावियोगे । आली सलज्ज संकलां प्रति मंत्र सांगे ॥ विज्ञापना करितसे परिसा सुचित्ते । लोटांगणी शरण बिल्हणपंडिताते ॥ १०९॥ अद्यापि धूर्जटि धरी विष ते स्वकंठी । कुमें धरागिरिवरा धरले स्वपटष्ठी ॥ आपोनिधीस वडवानळ नित्य जाळी । केलांगिकार बुंध पाळिति सर्व काळी ॥ ११० ॥ अद्यापि ते प्रथम-संगम-भोगकाळी । म्यां फेडिला हळ च कासवटा सकाळी $ लाजोनि दीप कर कोपुनि शीव वाते । कर्णोत्पली विझविले मज आठवे ते ॥ १११ ॥ अद्यापि ते स्मरतसे सरसीरुहाक्षी । मार्गी बजे रमण बिल्हण मी निरीक्षी ॥ कामानळे निजकलेवर दग्ध जाले । हा प्राण सांडिन तियेविण सत्य बोलें ॥ ११२ ॥ प्रत्युत्तरासि सखि सादर शीघ्र * झाली । बोले मुखावरि दिशा शशिची झळाळी सौभाग्यपर्वत तुझा न फुटे नखाने । चडे अभंग वरशील सुखे समग्रे ॥ ११३ ॥ नेले निशाचरवर जनकात्मजेसी। नेदी च खजनदृशा रघुनंदनासी ॥ ती कारणे रणमंही जिवदान केले । म्यां एक मस्तक दिले तरि काय जालें ॥११४ ॥ १ शिव. २ वडवाग्नि. ३ ज्ञाते. ४ कमल. ५ शरीर.६ रावण. ७ सीता. राम. १ रणभमी. *'मदन-मूर्ती मनीं वदावी' पाठांतर. + "संतप्त होय सकलां प्रितिपात्र सांगे' पाठांतर. 'समुद्र-वसना' पाठांतर. अंभोनिधीस' पाठांतर. समळी' पाठांतर. 'लाजोनि दीपकर कांपति वक्रवातें' पाठांतर. *'सिद्ध' पाठांतर. ++ पडे दिसे तेजशाली' पाठांतर. 'गेलें' पाठांतर.