पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिल्हण-चरित्र अद्यापि निर्मल-शरच्छाश-गौर-कांती । तात्काळ ते मन हरी मुनि वश्य होती ।। ते पूर्णचंद्रमुखचुंबनदान मागे। देखोनियां रात करीं मग सानुरागे ॥ १०१ ।। अद्यापि ते शरदकुंद-सुगंधितांगी । देखोनि होय मकरध्वज वाममार्गी * ।। दिव्यांगना-सुरततीर्थकृतोपकारी। जन्मांतरी वरिन मी मानिं हेतु भारी ।। १०२ ॥ अद्यापि या क्षितितळी प्रतिमा तयेशी । बाळा निरीक्षिली नसे गुणरत्नराशी ।। दिव्यांगनादिक गुणोत्तम कामसेना । वर्णावयास समता दुसरी असेना ॥ १०३ ।। अद्यापि राजतनया हित ही न जाणे । वर्ते तशी कुटिल भाव मनासि नेणे !! मी एक दैवत तिते दुसरे न मानी। ते राजहंसगति चिंतितसे निदानी ॥ १०४ ॥ अद्यापि ते नपति-शेखर-राज-पुत्री । संपूर्ण-यौवन-मदालस-खंजनेत्री ॥ गंधर्वयक्षसुरकिन्नर-राजकन्या । दिव्यांगना परिनितांत वयांतधन्या ॥१०५ ॥ अद्यापि वर्तुल-पयोधर-मंडितांगी। कंदर्प-सागर-लता कश मध्यभागी ! म्यां भोगले सकल भोग तिच्याऽनुरागें। होते व्यथा निशि दिनी वनितावियोगे ॥ १०६ ॥ अद्यापि ते कनककांति मदालसांगी। सल्लज्जनम्रवदना स्मरतो प्रसंगी ॥ * * त्यागी न औषधसुधा सरिता गुणांची । म्यां वर्णिली क्षितितली गुणकीर्त तीची +॥१०७॥ १ मीनकेतु. २ अप्सरा. ३ फौज, १ संकट. ५ भूषित. ६ प्रेम. ७ रात्र. ८ संकट. नदी. 'पात वेगी' पाठांतर. + 'उपमा दिसेना' पाठांतर. 'निजहीत' पाठांतर पदार्थ' पाठांतर. 'परिणितां न पवेति धन्या' पाठांतर. 8 उठतां पलंगी' आणि लटितां पलंगी' पाठांतर. ** 'ती जीवनासि धरितां' आणि ती जीवनौषधिसुधा, अशी पाठांतरें, प्रतिमा तयेची' पाठांता.