पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिल्हण चरित्र वस्त्रांचलस्खलन होत विलोकितांची । तीच्या स्तनांसि उपमा स्मर- कंदुकांची ।। ७३ ॥ अद्यापि ते *तरुण-पल्लवरक्तपानी । चोळी तिची तटतटीत भेजंग-वेणी॥ तुंडी-फळाधर कपोल-सुवर्ण-पात्रे । ते मी स्मरे + सरलहंसगतीवगात्रे ॥ ७४ ॥ अद्यापि हेमरुचिरा मृगशीवकाक्षी । # अंभोजवर्तुल-पयोधर- ६ पानवक्षी ॥ बीजे मँगांक उदयो करि तेवि देखा। श्रीचंद्रचूड कुचरूपनेखदुरेखा ।। ७५ ॥ अद्यापि कज्जल-विराजित- पा पूर्ण-नेत्री । कर्णी सुवर्ण धरि केतकि राज-पुत्री॥ नीले कलाप यमुना सुमनेक गंगा । भांगी सरस्वाति गुलाल बुका प्रयागा ॥ ७६ ।। अद्यापि ते गलतकुंतलपाश पाहे । बिबाँधरी जलनदी चिरकाल वाहे ॥ पानोन्नतस्तन कठोर हि चक्रवाके । मुक्ताफळे ** सुखद त्यांवर तेज फांके ॥ ७७ ॥ अद्यापि न रत्न-मणि-दीपजनीलतेचे। नाना विचित्र पडदे रसराजकाचे (जे)॥ राजात्मजा मजपुढे उभि मी निरीक्षी । सल्लज्ज भूत सुविलोकित खंजनाक्षी ॥ ७८॥ अद्यापि ते गलित कुंतल-पाश काळे ॥ वक्षोज नम्र वरि मौक्तिक हार लोळे ।। द्रोणाद्रि मंदरगिरी पयसिंधुपाळी । तैसे पयोधर तिचे धरि भोगकाळी ॥ ७९ ॥ अद्यापि राजतनया मृगशावनेत्री । म्यां देखिली विरह-व्याकुळ-पुष्पगात्री ॥ चेंड. २ सूर्य. ३ सोनें. ४ बालक. ५ पुट. ६ चंद्र. ७ शिव.८ तोडले. ९ उंच. १० पक्षि विशेष. ११ केश. १२ समुद्र.. अरुण' पाठ. + "अलस-हंसगती विचित्रे' पाठ. 'रंभोरु' पाठ. मी मिरीक्षी पाठ. 'निटिलींजशि इंदरखा' पाठ. पालोलनेत्री' पाठ. 'पय पाठ. PERस्फरत यास्तव' पाठ.++ रत्नमय दीप विलोकितो जे पाठांतर.