पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विठलहत. आलिंगिली करलता पसरोनि तीसी । सर्वात्मना विसर तो न पडो मनासी ॥ ६६ ॥ अद्यापि कामरति-तांडव-सूत्र-धारी । पणेदबिंब वदना जारी दिव्यनारी ॥ बाला विशाल-नयनालकदीर्घचिन्हीं। व्योमासमान कचमंडल दीर्घ [?] दोन्ही ॥ ६७ ॥ अद्यापि ते मलय-चंदन-लेप-भोगी। कस्तूरि-केशर-समिश्रित-चर्चितांगी ॥ चातुर्य-चारुशत-चुंबन-दानकामी । सल्लज्ज खंजनयना शयनी स्मरे मी ॥ ६८ ॥ अद्यापि ते शरदचंद्र-मुखी मृगाक्षी । लीलाधरा तरलमीनदृशा निलक्षीं ॥ काश्मीरचंद्र मंगनाभि-विलेपितांगी। तांबल देउनि विलासिनि नित्य भोगी ॥ ६९ ॥ अद्यापि ते कनक-कांति कलाभिधानी । प्रस्वेद-बिंदु वदनी रति-खेद मानी ॥ सारंगलोल-नयना सरताधिकारी । गोडी कदापि न विटे तिचि खंति भारी ।। ७० ।। अद्यापि एक मान विस्मितता तयाची । मो शोकलो परि हि जीवित नावळे ची॥... ते गुप्त चिन्ह कळले मजलागि ज्ञानी। तेव्हां सुवर्णदल लेवविले सुकर्णी ॥ ७१ ॥ अद्यापि ते कनककुंडल-जोड-धारी । रात्रीस चंद्र विपरीत-सुखाधिकारी ॥ आंदोलने करुनियां जलबिंदु येती। मुक्ताफळे विखुरली मजला गमे ती ॥ ७२ ॥ अद्यापि ते करि-विदारण-चक्रनेत्रे दंतक्षते सरत-विभ्रम होत गावे ॥ १ वेल. २ अप्सरा. ३ केश. आकाश. ५ पर्वत विशेष. ६ सुंदर. ७ पक्षिविशेष. ८ चंचल ९ कस्तुरी. १० सोने, ११ घाम. १२ मृग. १३ पत्र. १४ हत्ती.

  • 'चातुर्यतादशन-चुंबन इ.' पाठांतर. : वक्रनेत्रे' पाठांतर. दंतक्षतें करूनि' पाठांतर.