पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिल्हण-चरित्र जो सर्वलोक-हृदयांबुज-हंस त्याते । ध्यानी मुनींद्र भजती निजमुक्ति होते ॥ ५९॥ हैं बोलिजे जनपदें मग म्यां तयांते । जाणोनि उत्तर दिले हृदयीं वसे ते ॥ हो आयिका नपसुता-रतिसौख्य जाणे । अद्यापि देव दुसरा तिजवीण नेणे ॥ ६ ॥ अद्यापि ते कनक-चंपकवर्ण-गौरी । उत्फुल्ल-पद्मनयना तनुरोमहारी ॥ सुप्तोत्थिता च शयनी मदविव्हलांगी। विद्या जशी गति तशी स्मरतो प्रसंगी ॥ ६१ ।। अद्यापि चंद्रवदना नवयौवनांगी । पीनस्तनी मज पुढे उभि हेमरंगी । माझी तनू स्मरशरे पिडितां चि वेगीं। गात्रे सुशीतल करी सुरतप्रसंगी ॥ ६२ ॥ अद्यापि ते शरदपुष्पदलायताक्षी । वक्षोज-वर्तुल-पटद्वय मी निरीक्षीं । आलिंगितां सुरस घे मधुराधराचा। जैसा मिलिंदै रस घे नवपल्लवाचा * ॥ ६३ ॥ अद्यापि नालमतन् तिचि तेज-राशी। चंबावया रुळत कुंतल गंडे-देशी ॥ 1 ते वारितां ध्वनि उठे करकंकणाची । तेणे करोनि मुरकुंडि वळे मनाची ॥ ६४ ॥ अद्यापि ते सुरत-जागर-घूर्णमाने । वका विलोकन करी सुरताभिमाने ॥ श्रृंगारसारनलिनी गजराज-गामी। सल्लज्जनम्र-वदना शयनी स्मरे मी ॥ ६५ ॥ अद्यापि ते मदन-मंदिर-वैजयंती। म्यां देखिली विरह-व्याकुल मध्यराती ॥ परवासी.२ कमल ३ केश. ४ सुवर्ण, ५ बाण. ६ गोड. ७ भ्रमर. ८ गाल. प्रांत. १० सरोवर ११ पताका.. PARपकजाचा' पाठांतर. + निष्कल' पाठ. 'मदन व्याकळ' पाठ. देखोनियां निजमनी सुख-सिंधु लोटे । उदाहु-वल्लि पसरूनि कलन भेटे ॥ असाही पाठ आहे.