पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) विलकत. पाहावयास मिनले जन पौरवासी ॥ विज्ञापिती धनिक सेवक भूभुजासी ॥ मागेल द्रव्य तरि देउनि भूपतीते ॥ निर्मुक्तता कारीश या कवि बिल्हणातें ।। ५२ ॥ पाहावया नृपसुता गुरुपौरजाया ॥ येती मतंग-गमनी बहु घाबरीया ॥ कोणी कटी वसन खोउनि एक हाते ॥ कोणी करे धरुनि मुक्त हि कंचुकीते ॥ ५३ ॥ बिंबाधराप्ति. दयिते रददंश केले ॥ पाहात देर्पण करी सखि एक चाले ॥ येण्याई गुंफित नितंबिनि एक आली ॥ आच्छादुनी कुच करें सरशी निघाली ॥ १४ ॥ तांबूल घेउन उभी कर राजपंथीं। गुफीत हार कार सत्र विमुक्तग्रंथी॥ कोणी उभ्या धरुनि कंठ परस्परे ही ॥ कोणी गेवाक्षविवरांतुनि देखते ही ॥ ५५ ॥ संगे शतशत वध-गण-लोक येती । वयावनांत कविते नृपदूत नेती॥ दिव्यांगना सकरुणा वदति स्वभाव । लक्ष्मीपती कविस या जिवदान द्यावे ॥ १६ ॥ वध्यावनांत मग रोउनि शूल हेरी । काश्मीरकासि वदती हित तूं विचारी ॥ सुन्नात होउनि भजे जगदीश्वराला । अंती मती गति तशी मग होय त्याला ॥ ५७ ॥ बाले च ना म्हणनि बोलति लोक माते । अद्यापि का न भजसी भगवंतजीतें॥ माझा सुशह न फठे मन बुद्धि कैंची। जाते पुन्हा वदति भक्ति करी हरीची ॥ ९८॥ संसार दुस्तर भवार्णव थोर तारी । गाती जयासि सुर शक्र विधी पुरारी ॥ १ गजगती. २ आरसा. ३ स्त्री. ४ मार्ग. ५ स्विडकी. ६ वध्यस्थान, ७ ब्रह्मा. ८ शिव.