पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२६) आनंदतनयकृत तो पूतना कपटपाशभरोनि डोळे । घे मांडियेवरि हरी स्वमनांत पाळं ।। रत्ने म्हणोनि भरि इंगळ जेवि खोले । घेकाळ बाळमति पाहति लोक भाळ।।३५।। दनुजयुवति बोले तूं सखी राजबाळा कनककुसुमगौरी केवि व्यालीस काळा || खदखद हरि हांसे बोलिली सत्यशीळा बळदमन खलांचा दाखवी लोकलीला ।। ३६ ।। कमलनयन कान्हा घेतला वो रसाने । उचलुनि निज अंकी भाउनी बाल साने कुपितर्फणिगव्हाला हार मानूनि तीणे । स्वकरि धरुनि कंठी बांधिला दुर्मतीने ।। ३७ ।। जाणोनियां माँव तिची स्वभावें । झांकी हरी लोचन बाळभावे ।। शास्ता जगाचा जरि आकळीला । तरी न बोले घरि बाळलीला ॥ ३८ ॥ लक्षोनि कंजरुचिरक्षण राक्षसीला । हांसे तदा खदखदां दमि तो अशीला ।।। ते खेळवीत चुचकारुनि बाळ थानी । लावी सतोष मग पूर्वमनोरथानी ।। ३९॥ देखा माखनियां विर्षे स्तन मुखी लावी मुखा संमुखे चोखी लोकशिखामणी सुरसखा शोषावयाते सुखे ।। पाखाळोनि विखा तिच्या नखशिखा शाखांशु चाखावया शेखी लेखुमि खेचरी तृणशिखा जे पातली खावया ।। ४० ॥ पयोधिसंक्रांतपयोधराचे । परी धरी अग्र पयोधेरीचे ।। शोषी अशेषांगरसासि गा तो । ब्रह्मादिदेवोत्कर ज्यासि गातो ।। ४१ ।। स्तनाननी तो जडला जळूसा | जाला तिला हा परता टळूसा ।। मिठी प्रयत्ने न सुटे हरीची । भांबावली बुद्वि महासुरीची ।। ४२ ।। रक्ताते अनुरक्त देखुनि हरी आरक्त डोळे करी युक्तीने बहु शक्ति वैचुनि करी सोडोनि घे लोकरी ।। तो कांहीं न सुटे चि तो दृढ मिठी दाटे भयें साहसी खासी काय मला मुला मग म्हणे शोषू किती पाहसी ।। ४३ ।। आंगी जियेस नव नागसहस्रशक्ती ते सोडवी कुटिल दाउनि बाळभक्ती ।। ४३ इंगल=निखारे. १४ खोळ वस्त्रादिकांची खोळ. १५ दनुजयुवति पूतना. ४६ रसाने प्रीतीनं. ४७ साने धाकटें. ४८ फणि= साप. ४१ माव =क पट. ५० कंजरुचिरेक्षण -कमला प्रमाणे सुदर आहेत डोळे ज्याचे. ५१ लोकशिखामणि त्रैलोक्यभूषण कृष्ण. ५२ पयोधर स्तन. ५३ उत्कर-समूह. ५४ नाग-हत्ती.