पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूतनावध. (२२७) आतां किती स्तन पिसील धरूनि कृष्णा एसी असे तुज कसी मज सांग तृष्णा ।। ४ ४ ।। ते बाळ दैत्यकवेळासि असे भुकेले । रक्ते तिच्या म्हण अपोशन आजि केले।। तत्प्राण जाण हरिले निज विक्रमाने प्राणाहुती मॉगति पांच अनुक्रमाने ।। ४५ ॥ सौजन्यस्तन्यपाने घुटघुटुनि तिचे प्राण सत्राण नेले व्याने ते उग्रतेने चरफडुनि मनी शब्द निःशब्द केले ।। सोडी सोडी म्हणोनी प्रगट घडिघडी रंगणी अंग घाली घोराकारे शरीर तळपुनि पडली पूतना भूतजाळी ।। ४६ ।। मायां पिंगट झिपऱ्या मुखबिळी विक्राळ दंतावळी डोळे वर्तुळ रक्त कर्कश तन कंठध्वनी आंवळी अभ्रीं वादनि वाड धाड पडली तेणे थरारी धरा ।। मूर्छाग्रस्त समस्त कोण धरिती कोणासि शोणाधरा ।। ४७ ॥ गोपी गोपाळ गाई पडुनि महितळी शब्द तीते अगाई ऐशी राया नवाई जनि वनि पसरे राक्षसीची अवाई ।। तेहांसे शेषशायी भवतपनतपक्रांत संतोषदायी त्या कृष्णाचे च पायीं नमन करितसे आरणीचा शिपायी ।। ४८ ।। समाप्त. ५५ कवळ घांस.