पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूतनावध. (२२५) ऐसि सुंदीर ते मंदहास्य चाली । नंदरायाच्या मंदिरासि आली || द्वारपाळा मारितां तीव्र भ्याली । मोह पाडोनी मंदिरी निघाली ॥ २४ ।। पंकजाक्षी निःशंक शांत बंकी | रक्षपाला पाडुनी मोहपंकी॥ जाति जाली कृष्णासि घेउं अंकी । जो हा दाता आनंदतनय रंकी ॥२५|| ॥श्लोक ॥ संतानाविण फार दीन कमले हे फार चिंता मला होती हो बहु आजि देखनि सुता हा जीव विश्रामला ।। पात्री रत्नमणी फळावळि विडे खजूरही खोबरें ठेवी बाण पुढे म्हणे मज सये दे बाळ पाहों बरें ॥ २६ ।। बाई तुझा पाहुनि कृष्ण तान्हा । आला पहा वो मजलागिं पान्हा ।। मिथ्या असा तेथ करूनि बाँन्हा । येवोनि घे शीघ्र मनोज्ञ कान्हा ।। २७ ॥ जाले बहू मन उताविळ वो यशोदे । दे बाळ लौकर करी हृदयीं धरूं दे । पान्हा भरोनि न घरे मजलागिं बाई । दे दे म्हणोनि चमके करि फार घाई।।२८।। बहुत आवडती मज लेकरे । म्हणुनि खेळउं धाविनली करें ।। त्वरित खेळवि आननकोमला | तुजविना मज आन नको मला ।। २९ ।। प्रेमा ऐसा दाविते दैत्यभाजा । तेणें तोषे नंदभार्या समाजा ।। मी दैवाची माझिया बाळकाला । पाहों येती लोक नीलालकाला ॥ ३० ॥ 18 लखलखित विराजे पाळणा होंटकाचा । खचित मणिगणाने त्या जगन्नायकाचा ।। झळकत वरि भारी घोस मुक्ताफळांचा सहज हरि निजेला मानि हंता खळांचा ।। ३१ ।। झडकरि मग आली घ्यावया बाळकृष्णा घडिभर मुख पाहे कृष्णमाता सतृष्णा ।। उचलुनि हरि अंकी सोयरा सज्जनांचा । निजहृदयिं धरीते साध्य जो साधनांचा ॥ ३२॥ नंदा मना त्वरित नंदकुळावतंसी । देखोनि तल्लिन मुखद्युति पाहुं कैसा ।। घे मांडिये क्षणिक मानसराजहंसा । ते राक्षसी अनुमिते रिपु हा चि कंसा ॥३३॥ ठावे नसे किमपि नंदनितंबिनीली । दे कौतुके म्हणुन त्या नवमेघनीला ।। साधूजना कुटिल ते वरि काज नाहीं । नाहीं च आपपर काहिं च योजना ही॥३४।। ३१ बंकी, बकी पतना. ३२ पक-चिखल. ३३ अंकमांडी. ३४ बान्हा मिष. ३५ मनोज्ञ संदर. ३६ दैत्यभाजा पतना. ३७ समाजा=स्त्रिर्यासह. ३८ नीलालक-निळे आहेत केंस ज्याचे असा. ३९ हाटक सोने. १० नंदकुलावतंस नंद कुलभूषण रुष्ण. ४१द्यति शोभा. ४२ नितंबिनी स्त्री.