पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२४) आनंदतनयकृत सालंकार सेंबल्लवी मिरवती सौवर्णवल्ली वनी तैसो होइन मी न मंजुनयना मी येउनी यौवनी ॥१॥ जाली तत्काळ रंभा दिसत मृदु जिचे ऊर कपरंभी ।। गंगेच्या चंदभासम तरळ गळां हार ल्याली सदंभा ।। मत्तीच्या निकुंभाकात कठिण उरों दावि वक्षो कुंभा भासे ऐसी स्वयंभा मनि कुटिलपणे ते रती की स्वयंभा ॥ १५ ॥ जाती नूतन नूतना व्रजवधू तत्संगती पूतना आली नंदनिकेतनासि निरखू पक्षांद्रसकेतना ।। तेथे गोवळराज नृत्य करिती कृष्णास नीरंजना बैसे त्या च सभाजनांत निरखी योगीशहद्भाजना ।। १६ ॥ पुढे बैसलीसे जसी मानवी ते । हरी देखुनी क्रोध दुर्मान वीते ।। सभे अंगसौभाग्यभी मानवीते । यशोदा पुसे कोण भीमा नवी ते ॥१७॥ स्वये वदे स्वागत गोपिकाला | जे जिंकितें कंठवें पिकाला ॥ म्हणे यशोदे तुझिया मुला मा । पाहोनि धाले व्रज भूभूलेलामा ॥ १८ ॥ ॥दिया॥ काय वानं कापट्य कामिनीचे । इंद्रचंद्रा नेणवी रूप जीचे ॥ ध्र० ॥ भूमिपर्यंत रुळे नीळ वेणी । वरी शोभे ती भव्य नगश्रेणी ॥ चंद्र आणी शीसफुल फुलावाणी । भाळि भांगटिला नासिकी सपाणी॥१९॥ चुडे कंगणिया हातसरे दोरे । कटी शोभात ते भव्य कडेदोरे ।। फार साजे सौंदर्य दैत्यदारे । कामिलोकांचे चित्त जे विदारे ॥ २० ॥ बाळ्या भोकरें जडित ते काप कानीं । हार कंठी दैदीप्य माणिकांनीं ।। करी मुद्रा वीराजमान मानी । कोणि ऐसी देखुनी धैर्य मानी ।। २१ ॥ वांकि बाहुवटे बाजुबंद बाळी | व्याले चोळी ते मोतियांचि जाळी ।। हेमवसनाचा घोळ तळी घोळी | मनी कपटी बाहेरि दिसे भोळी ॥ २२ ।। पदी साखळिया नपुरादि वाळे । बिदी चालतसे दाखवीत चाळे ॥ डोळे मोडतां चि गोपवंद भाळे । जो तो पाहे तल्लीन रौंजबाळे ॥ २३ ॥ ११ बल्लवी-गवळणी. १२ यौवन तारुण्य. १३ ऊरु=मांड्या. १४ कर्पूररंभा कपूरक्रदली (केळ). १५ चंचदंभ हलणारे पाणी. १६ मत्तेभ मदोन्मत्त हत्ती. १७ निकुंभ-गंडस्थळ. १८ वक्षोजकुंभ स्तनकलश. १९ निकेतन घर. २० पक्षींद्रसंकेतन गरुडध्वज (कृष्ण). २१ योगीशहाजन योग्यांच्या हृदयांत राहणारा (कृष्ण ). २२ मा कांति. २३ भामा -स्त्री. २१ रव-शब्द. २५ पिक-कोकिल. २६ ललामभषण. २७ नगश्रेणी-दागिन्यांची पंक्ती. २८ बिदीवाटेत. २९ बूंद-समूह. ३० राजबाळा उत्तमस्त्रो (अशा प्रकारची दुसरों उदाहरणे:-राजमार्ग, राजहंस, राजविद्या, रायआंवळी इ.).