पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूतनावध. (२२३) कसभूपति अप्ता बहु भ्याला । कृष्णरूप चि दिसे जग त्याला ।। बैसला निजसभादलोकी । अंतरी मन बड़े भयशोकी ॥४॥ चाणूरमल्लादिक दैत्यकोटी । तो मेळवी भीति धरोनि पोटीं ।। पाचारुनी पातकि पूतनेला । वधावया कृण्ण विचार केला ॥ ५ ॥ बोले रोषुनि प्रतना प्रभु म्हणे कां वाहतां काळजी काळातें दमणार मी उमगिते बांधोनियां बाळ जी ॥ पाताळी नभमंडळी क्षितितळी तो जेथ जैसा असे तैसा शोध करोनि साधिन तुझे कार्यार्थ राया असे ॥ ६ ॥ ॥दिंड्या ॥ कसराय देऊनि चौरमाळा । महा तोषाचा घेउनी उमाळा ।। प्रेरियेली पूतना नाम बाळा । जगीं धुंडाया देवकिच्या बाळा ॥ ७ ॥ कथा ऐकें कल्याण कौरववेशा । बाळकृष्णाच्या पहा महावेशा ।। फिरे फेरे फीरता फार सारे । ग्राम कुग्राम पुया अग्रहारें ।। ८ ।। मुले सर्वत्र हि जी तिं सकूमारे । तशा सर्वांच्या पेटालसे मारे । होति कृष्णा जन्मोनि दिवस दाहा | तशा बाळा देखुनी उठे दाहा॥९॥ कामरागादिक मोह जिथे साहा । तेथ कैंचा वावेक फारसा हा ।। हरी साठी बाळकें लक्षकोटी । जिणे भक्षीली दीर्घ दंतकोटी ॥१०॥ गोकुळासी येतां चि तदा मोटी । दिसे माया चेटकी कपट पोटी।। वये सोळा वर्षांत उभी ठेली । सुतारुण्ये तारुण्य गुणठेली ॥ नंदपुत्राच्या दर्शना भुकेली । दिडि ऐशी आनंदसुते केली ॥१॥ ॥ श्लोक ॥ एथे असेल बहुधा शिशु कंसहता । शोधोनि साधिन म्हणे धरुनी अहंता ॥ लक्ष्मीविलास दिसतो नगरांत भारी । तो सांपडेल मज दानववल्लभारी ।। ११॥ जेथे पद्मवने अपार तुलसी जेथे बहू गोधनें जेथे वैष्णव वेदपाठ करिती सद्वाक्य संबोधनें ।। जेथे पुष्पफळी सपल्लवदली शंगार आला वना तेथे क्रीडतसे हरी कविवरौं हे वर्णिली भावना ॥ १३ ॥ पूर्वी हे स्थिति हा विलास सुख हे नाहीं च या गोकुळी आला साच गमे हरी नरहरी या नंदजीच्या कुळीं ।। ७ चीर लुगडें. ८ बाळा-स्त्री. १ दाहा=आग, १० गुणठेली गुणांची पिशवी.