पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२०) वामनपंडितकृत ऐसे च लक्ष्मणकुमार हि वंशकेतूं । तो एक अंगद दुजा सुत चंद्र केतु ॥ तक्षाख्य पुष्कळ अशी भरतात्मजांची । नामें कुळे बहुत विस्तरणार ज्यांची ।।७७।। शत्रुघ्नपुत्री स्वसमाजसाची । नामें सुबाहू श्रुतसैन साची ।। शत्रुन्न मारी असुरास आणी । तद्वित्त रामार्पण हेतु आणी ।। ७८ ।। शत्रुन्न नाम गत दाखवि अर्य साचा । की पुत्र जो लवण त्या मधुराक्षसाचा ।। मारूनि तो मधुवनीं मधुरा स्रजी की । जीमाजि कृष्णतनु राम खळास जिंकी ॥७९॥ पतीची पदें काननी रामरामाँ । स्मरोनी ह्मणे आननी रामरामा ।। मुनीच्या करी पुत्र आणूनि घाली । क्षितीत वये माय पोटी निघाली ॥ ८० ।। आयकोनि जरि शोक निवारी | चालिले चि नयनांतुनि वारी ।। राखिले गुण तिचे हृदयातें । नावरे चि अजि त्या सदयाते ।। ८१ ॥ सीता हेतु क्लेश आधींत रामा । एवं लोकी दुःखमूळाच रामाँ ।। थोरां थोरां कष्ट यांच्या चि संगें | दावी ऐसें राम सीताप्रसंगें ।। ८२ ।। जया ही वरी अग्निहोत्रादि याजी । करी ब्रह्मचर्य स्वयें तो क्रिया जी ॥ अखंडाग्निते राम हस्ती अ होमी । करी ख्याति की कर्म कर्ता अहो मी ।।८३।। पदयुग मृदु जे कां पल्लवातुल्य वाटे। तदपि तुडवि कांटे दंडकारण्य-वाटे ।। स्मरति चरित त्याला ठेउनी तो चि ठेवा । गमन करि मनी ते लोक हे पाय ठेवा।। ८४|| आश्चर्य की अधिक साम्य जया असेना | त्याला सहाय समरी कपिऋक्षसेना ।। बांधी समुद्र वधि रात्रिचरांदिकां ही। हे कीर्ति तारक हि त्यास न थोर कांहीं ।। ८५।। गाती ऋषी नृपपतीप्रति या यशातें । पापघ्न शुभ्र करि दिग्गज तो दिशांते ।। तो राम मी शरण तच्चरणांबुजाते । संभाविती सुरनरेद्र किरीट ज्यातें ।। ८६ ॥ रघुपति-चरणाचा दर्शन स्पर्श लाहो । निघति परम योगी भाग्य ते कोशला हो । उठत बसत चिंती राघवस्पर्श लाहो । जित चि भव जयाचा राघवी नाशला हो ।। ८७ ।। पुरुष रघुपतीच्या आयके जो कथा रे । भवभय नत याचे हे घरी एक थारे ।। तुटति सकळ कम होय दुःखाग्नि हिंसों। परम करुण मूर्ती होय टाकूनि हिंसा ।। ८८ ॥ केतु-ध्वज. २ एथे दुर्बोत्व आहे. ३ " श्रुतसेन" याबद्दल " बहुश्रुत" असे नांव रघुवंशकाव्यांत आढळतें. ४ स्रजी निर्माण करो. ५ कृष्णतनु मेघश्याम. ६ रामरामाचीरामाची स्त्री सीता. ७ मायपोटी-आईच्या उदरांत. ८ वारी पाणी, अश्रु.१ रामा स्त्रिया. १० एथें कांहीं अपपाठ असावासे वाटते. ११ रात्रिचर-राक्षस. १२ हिंसा थंड सा १३ हिंसा-जीव हानि.