पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संकलित रामायण. (२२१) नृप पुसत शुकाते वर्तला कवि राम । स्वजन अनुज लोकी सर्व लोकाभिराम ।। वद सकळ जनी ही केंवि तो पूर्णकाम । प्रियतर वरिला जी हा करी पूर्ण काम ।। ८९॥ सिंहासनी बसलिया वरि ही जयाते । धाडी स्वबंधुवश सर्व हि तेज यातें ॥ भृत्यांसह प्रभु फिरे नगरीस पाहे । श्रीमति दाखवि जनास करी कृपाहे ।। ९०॥ गजमदसलिलोचे की सडे चंदनाचे । । सुरवरमुकुटांचे वोवसे चंद नाचे ॥ नगर विविध दावी भाव हे मानसाचे । रघुपतिपदपद्मी लाधले मान साचे ॥ ९१॥ गोपुरे उपरमाडिया सभा । हेमकुंभ वरि देति यास भी ॥ मंदिरी सुरगृहीं ध्वजाचिया । साउल्या निबिड नित्य ज्याचिया ॥ ९२ ॥ प्रतिद्वारिरंभी दिपूँगी फळाचे । तरू घोस केले फुलापोफळांचे ।। प्रभा तोरणांमाजि की आरशांची । महादीप्ति हेमांबराफारशांची ॥ ९३ ॥ स्थळी स्थळी आणुनि पूजनाते । ते पूजिती लोक निरंजनाते ॥ ते बोलती पाळिं अजी क्षितीतें । पूर्वी तुवां उद्धरिलें चि तीते ॥ ९४ ।। दखान काळे बहु राघवास त्या । त्या पाहती टाकुनियां गृहे सत्या ।। ज्या सुंदरी वेघति मंदिरोपरी । पुप्पे बहू वर्षति हो परोपरी ॥ ९५ ।। ये त्यावरी निज गृहाप्रति विराजे । की देखिले सकळ पूर्ण जयांत राजे ।। वस्तू अमूल्य गणना न धना कदापी । जे कां कुबेरवरुणेंद्रगृहास दापी ॥ ९६ ॥ स्वयंभा वैडूर्या करुनि रचिले स्तंभ बरवे । तया च्यारी पंक्ती क्षितिवरि बरी पाच मिरवे ।। प्रवाळांची द्वारे स्फटिकमय भिंती विरचिता।। गृहाच्या रामाच्या सकळ रचना दिव्य उचिता ।। ९७ ॥ शंगारिल्या चित्रविचित्र हारी । मुक्तादिकी रात्रितमोपहारी ।। सर्वोपभोगार्थ समृद्धिकारी | सर्वे गृही त्या प्रभु निर्विकारी ॥ ९८ ॥ सुगंधी सदा धूपदीपी विराजे । जन स्वामि त्याच्या गृहीं जैवि राजे ।। स्त्रिया जेवि देवांगनी दासदासी । अशा मंदिरी चित्त रामी उदासी ।। ९९।। ११ अभिराम सुंदर. १५ सलिल उदक. १६ भाकांति १७ रंभा केळ. १८ पूगफळ-पोकळ, सुपारी. १९ वैदुर्य-रत्नविशेष. २० देवांगना अप्सरा.