पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संकलित रामायण. (२१९) रामवृत्त कायले यमकांनीं । गाति त्यांस न पडे यम कानी ।। भिन्न अर्थ रचना सम जावी | काव्यरीति चतुरी समजावी ।। ६५ ॥ तदुपरि शुक सांगे राम मांडी मैखाते ।। निजपद चि यजी ने हे जगद्धाम खातें । गुरुवचन विधाने लंकनाथारि पूजी । सुरमय सुर सेवी तद्रिपूचा रिपू जी ॥ ६६ ॥ दिशा पूर्व होत्या दिली दक्षिणा हो । दिली ब्रह्मयाते दिशा दक्षिणा हो ।। प्रतीची स्वअर्ध्वर्यु देतो जयाला । उदीची दिशा देत उद्गातयाला ॥ ६७ ॥ आचार्य जो मध्यम भू तयाला | देतां महा उत्सव दातयाला || हे निस्पृहो ब्राह्मण सर्व लाहे । गोडी म्हणे राममतीस लाहें ॥ ६८ ॥ तनुस अंबेरमात्र चि भूषणे | इतर सर्व दिले रघुभूषणे ।। करि असे रघुनंदन दान की । उभि समंगळसूत्र चि जानकी ॥ ६९॥ घेऊनियां ब्राह्मण सर्व लाहो । ते बोलती ब्राह्मणवत्सला हो । जो ब्राह्मणांचा स्वयमेव देव । प्रभूसि त्या बोलति भूमिदेवें ॥ ७० ॥ न जी दीधले काय आम्हांसि देवा । दिले फार याहूनि ही देवदेवा ।। प्रकाशोनि चित्ती अविद्यातमाते । हरी देखतो त्या चि सर्वोत्तमाते ॥ ७१ ॥ सर्वज्ञता दशर्शतानन ही न मोजी । ब्राह्मण्य देव रघुराज तुते नमो नी ।। तूं पुण्यमार्त अजि मस्तकरत्न देवा । जो दे स्वपाद रज हंसर्जना सदैवा ॥७२॥ जयाचा जगी कीर्तिसंल्लाप हा तो । स्वये गूढ राती जना हो पहातो ॥ वदे एक कोणी स्वभास वाचा । तिते आयके श्रोत्र तो राघवाचा ।। ७३ ।। स्वये जासि दुष्टे पराच्या गृहाते । नव्हें राम मी की धरूं तूज हातें ॥ दशग्रीव लावूनि ने हात सीते । वधूलब्ध अंगीकरी हा तशी ते ।। ७४ ॥ दुराराध्य जे अज्ञ ते लोक रीती । न जाणोनि वार्ता अशा ही करीती ।। म्हणूनी सितेते वियोगश्रमाते । करी जाय ते वाल्मिकी आश्रमाते ॥ ७५॥ ऋषिजवाळि असे ते गर्भिणी रामराणी । वन विभव हि मानी डोहळ्यांची शिरीणी।। कुश लव सुत दोघे होति ते दिव्य काळीं । मुनि करि विधिक, उत्सवाच्या सुकाळीं ॥ ७६ ॥ ९२ मख-यज्ञ. ९३ होता, ब्रह्मा, अध्वर्यु, व उद्गाता असे चार ऋत्विज यात असतात. ९४ अंबर वस्त्र. ९५ भूमिदेव ब्राह्मण. ९६ दशशतानन शेष, ९७ मस्तकरत्नशिरोभूषण. ९८ हंसजन परमहंस, म्ह० सन्यासीजन. ९: वधू लुब्ध स्त्रीलपट. १०० शिराणी आवड.