पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संकलित रामायण. (२१७) कनकमयपताका वृंद चित्र ध्वजांचे । रथ चपळ तुरंगी स्वर्णसन्नाह ज्याचे ।। कवच सहित योद्धे मुख्य मुख्य प्रजांचे । प्रभुप्रति मुंळ येती दास पादांबुजांचे ॥ ४६॥ चिन्हें महा विभव राजविलास मुद्रा । आणी पुढे भरत त्या करुणासमुद्रा ।। प्रेमें पदावारे पडे विसरोनि देहा । आलिंगने प्रभु भुजा पसरूनि दे हा ।। ४७ ॥ प्रथम शिरिहुनी त्या पादुका पादपद्मा । जवळि भरत ठेवी ज्या पदी नित्य पनी । मग चरणिं पडे त्या क्षेम दे सूख भावा । प्रभु नयन जळी सप्रेम न्हाणी स्वभावा ।। १८ ॥ ब्राह्मणासि करि चंदन पादी । हे मला प्रिय असे उपपादी ।। लक्ष्मणा क्षितिसुते सह पायीं । लोक वंदिति जयासि उपायों ॥४९॥ कोसलाधिपति कोसललोकी । देखिला बहु दिशा अवलोकी ।। नत्य वस्त्र उडवनि करीती | पुष्पवृष्टि वरि कौतुकरीती ।। १० ।। धरी मस्तकिं पादुका व्यजन चामरे वीजिता । विभीषण कपींद्र जे निज सुखे तयाच्या जिती ।। सुधाकर धरी मरुत्सुत असीतपत्राकृती । प्रवेश करि राघव स्वनगरी पवित्राकृती ॥ ५१ ।। धरुनि सधनु भाते दास्य शत्रुघ्न मानी । धरि करि जळझारी रामकांता विमानी ।। धरियलि तयि जैसी अंगदे ऋक्षपाळे । विभव नगर लोकां दाविले लोकपाळे ॥ ५२ ।। रघुपति अति शोभे पुष्पकी व्योम वाटे । द्विजगुरु सह नेत्रां उत्पळा सोम वाटे ।। नटति युवति गाती कीर्ति बंदी विमानी । प्रियतम जन आत्मा आपुला जेंवि मानी।।५३।। रचित कुसुम आले श्रीअयोध्यापुरीते । जन अमृत रसाच्या वाहती त्या पुरीते ।। नृप गृहिं गुरुपल्या माउल्या त्यांस भावी । नमन करि तयांते तोषले बंधु भावी ।। ५४ ।। ७२ सन्नाह घोड्याचे सामान. ७३ मुळ येती-सामोरे येती. ७१ करुणासमुद्र-कपासागर. ७५ पद्मा लक्ष्भी. ७६ क्षेम आलिंगन, ७७ एथं " स्वशिरिं" असे असते तर छंदोभंग न होता. ७८ व्यजनचामरें-विंझणे व चवन्या. ७९ वीजिती वारा घालिती, ८० सोम-चंद्र. ८१ बंदी भाट, स्तुतिपाठक.