पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१६) वामनपंडितकृत रडति दशमुखाच्या त्या स्त्रिया नाय ! नाय ! तुजविरहित लंका आणि आम्ही अनाथ ॥ नगरिवरि रुसोनी वीरसेजे निजावे तरि शरण पुरीने आजि कोणास जावे ।। ३५ ॥ होउनी वश तुवां मदनाते । आणिली प्रभुवधू सदनाते ।। क्षोभली जनकराजकुमारी । जे प्रभाव चि असा तुज मारी ।। ३६ ।। लंका स्त्रियां सहित ते विधवा चि केली । गध्रा न ते तनु हि जे विषयीं भुकेली ।। सद्वंशभूषण हि तो नरकासि जासी । केला अनर्थ सकळां तनुजानुजासी ।। ३७ ॥ पुसोनि रामास बिभीषणाने । क्रिया मृताच्या कुळभूषणाने ॥ केल्या स्वशास्त्रे परलोकरीती । तिलोदके लोक जसे करीती ॥ ३८ ॥ देखे रघूत्तम अशोकवनांत सोते । नेत्री स्रवे विरहशोकवना तशी ते ।। नाही च बिंदुभरि ही जल जात कंठी । कंठीतसे दिन अशी जलजीतकंठी।।३९।। पावली स्वविरहे तनु कंपा । राम तीवरि करी अनुकंपा ।। होय तो चि सुखवासर सीते । ध्यान राम सुखवा सरसी ते ॥ ४० ।। जवळि अनुज सीताराम बैसे विमानी | कपिपति सह जातो बंधते जेवि मानी ।। दर्श खअनुजा दे उत्तमश्लोक लंका । पवनज सह यानी घेतया निष्कलंकी।। ४१ ।। प्रभु करि चिरजीवी शत्रुच्या सोदरासी । रवि शशि गगनीं जो राज्य दे मोदराशी ।। रघुपति परते हो ते सुरां सौख्य वाटे । स्तविति कुसुमवर्षे त्या विमानांत वाटे ॥ ४२ ॥ गोमत्रपक्क जैव भक्षुनि वाट पाहे । येणे तदर्य भरतावरि हो कृपा हे ॥ की स्थंडिला वरि निजेक्षण कॅल्प कंठी । तो प्राण ठेउनि असे बसला स्वकंठीं ।।४३।। अवणिं भरत ऐके राम आला अयोध्ये । अभिमुख विभुते ये यति आमात्य योद्धे ।। पुरजन गुरुसंगै पादुका मस्तकांती ! करिति रवि शशीच्या ज्या अहो ध्वस्त कांती ।। ४४|| वसे नंदिग्रामी परि हृदय रामी भरत तो। विना त्याचे पाय त्रिभुवनिं न जो लाभ रततो ।। वसे वेदध्यायी धरि इतर ठायीं न मन तो । करी वाद्या गीता सहित पदपद्मा नमन तो ।। ४५।। ५९ तनुजानुज पुत्र व बंधु. ६० शोकवन शोकोदक (अश्रु).६१ जलजातकंठी= जलजात म्ह० शंख त्याचे सारखा आहे कंट जीचा अशी. ६२ अनुकंपा कृपा. ६३ दशमुख अनुज बिभीषण.६४ निष्कलंक निष्पाप.६५ सोदर बंधु. ६६ मोदरासी-आनंदरासी. ६७ गोमूत्रपक्क गाईच्या मुतांत शिजविलेले. ६८ जव सातु (धान्य). ६. स्थंडिलावर नुसत्या जमीनीवर. ७० कल्प-अतिदीर्घकाळ. ७१ अमात्य-प्रधान.