पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिल्हण-चरित्र. जाली तुला सकळ व्युप्तति राजबाळे ॥ नाही तुला शिकविले स्मरशास्त्र पाहीं । अंभ्यासितां विदित होइल सर्व ते ही ॥१५॥ ते बोलतां परम सद्गद मंद वाचे । हम पादारविंद धरिले कवि बिल्हणाचें ॥ ते काम-शास्त्र तुमचेनि मुखे वदावें । त्यानंतर स्वनगरा प्रति शीघ्र जावे ॥ १६ ॥ शोभे निकै तनु तिचे महके सुगंधे । * कर्पूर धूप मणिमंडित पाचबंधे ॥ अंगारिले लखलखाट दिसे दिगंतीं । सौदामिनी लवत तेज पडे दिगंती ॥ १७ ॥ शंगाार--कानन गमे निज मन्मथाचे। देखोने चित्त रमले कवि बिल्हणाचे ॥ आमंत्रिला त्विरित मन्मथ तो शरीरी॥ आरंभिले रति--रहस्य ह्मणे विचारी ॥ १८ ॥ नानासने नयन पावर्तन हास्य गोष्टी । कंदर्प-सिंधु विपरीत कला प्रतिष्ठी ॥ हे सांगतां परम व्याकुळ कामबाणे । जाली ह्मणे विविध शास्त्र-विधि प्रमाणे ॥१९॥ हे ऐकुनी खवळले मन आंवरेना ॥ होणार जाण सहसा लिहिले टळेना ॥ देवी कळाऽघटित ते च विचारिलेसे । गांधर्व लग्न सदनों मग लाविलेसे ॥२०॥ या नंतरे खचित-रत्न-पलंग सेजे। क्रीडा करी प्रथम काम सुखासि लाजे ॥ आलिंगनी दृढ तिला धरितां चि झाडी । संघटनी बहुत भी परि मी न सोडी ॥ २१ ॥ म्यां घातला स्वकर जो निरिमोचनाते । कंदर्प-मंदिर-कपाद- सुवेष्टनाते ॥ बाळा वदे सुरत हास्यरसाधिकारी। पाठ. पादकमल, २ वीज. ३ अरण्य. ४ समुद्र 'कस्तुरी' पाठ. + 'मदनभूपतिनें' नूतन' पाठ. 'युद्ध' पाठ.६ विघटनाते' पाठ. 'चित्त' पाठ.