पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विठ्ठलकृत. 'दिव्यांबरे भुषण दीधलँ थोर माने ॥ ७॥ मंत्री ह्मणे निजसुताध्ययनार्थ राजा । पाहे कवीश्वर प्रतीदिन एक वोजा ॥ भाग्योदयार्थ घडले नगराार्स येणे। सांगो नपास मग जाउन भेट घेणे ॥८॥ गेला सभेप्रति पुरोहित काय बोले । राया मनोरथ तुझे परिपूर्ण जाले ॥ काश्मीरदेशकवि बिल्हणमिश्र नामे । आला * नृपाश्रय दिजे नूप सार्वभौमे ॥ ९॥ तोषोनि भूपति ह्मणे स्वपुरोहितांसी । भेटावया त्वरित घेऊन ये कवीसी ॥ होजी ह्मणोनि गुरुजी सदनासि आले । प्रेमादरे प्रभुशि नेउनि भेटवीले ॥ १० ॥ प्रज्ञा प्रगल्भ कवितारसवृत्ति मोठी । संतोषले नृप सभासद धूर्त पोटीं । छंद प्रबंध यमके पदबंध दीक्षा । वेदोक्त संस्कृत गिरा प्रभु दे परीक्षा ॥ ११ ॥ जाला मनी परम तोष महा नरेद्रा-।। ऽलंकार हेमे वसने दिधली कवींद्रा ॥ विज्ञप्ति भूभुज करी कविचूडरत्ने । कन्येसि अध्ययन सांग किंजे प्रयत्ने ॥ १२ ॥ आज्ञा समर्थ तुमची कविराज बोले । केला मुहूर्त पढतां पद पाठ झाले ॥ प्रज्ञा विशाळ गुणवंत पढो निघाली । थोड्या दिसांत तिासे व्युत्पति फार झाली ॥ १३ ॥ केले च अध्ययन संस्कृतप्राकृताचे । पातंजलादिक महाश्रत शास्त्रचर्चे ।। गांर्धव वैद्य रस ज्योतिष मंत्रविद्या । भाषा कवित्वगुण काव्य कला समुद्या ॥ १४ ॥ तो बोलला वचन चंद्रकले सुशीले । १ "पूज्यांबरें दिधलिं सुकृत दोर्ष मानें" असाही पाठ आहे. २ सुवर्ष. ३ राजा र शिरोमणि. . "गृहाश्रय" पाठांतर. "मी बोलिलो " पागंतर.