पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संकलित रामायण. (२१५) येतां निशाचर.मू अतिवीर्यशक्ती । हाती धनुष्य शर तोमर शूळ शक्ती ।। सुग्रीव लक्ष्मण मरुत्सुतै ऋक्ष नीळ । या अंगदादि सह ये प्रभु मेघनाळ ॥२४॥ त्या अंगदादि रघुनायक-वानरांनीं । शस्त्री गदा गिरि तरू शर तोमरांनी ।। ते मारिली निघनिघों चतुरंगसेना । सतिापहारक-दळी शुभ ते दिसेना ॥ २५ ॥ लंकेश लक्षुनि बळें क्षय कोपताऐं । ये वाहनावरि चढोनि महाप्रतापे । तो ये सुरेद्रीय त्यावरि रामराया । हाणी शर त्रिशत रामशरे मराया ॥ २६ ॥ बोले रघूत्तम खळा मळ राक्षसांचा । तूं श्वान शून्य गृह भोजन भक्ष साचा ।। सीता परोक्ष हरिसी तुज नित्रपाते । मी काळ मारिन अमोघबळास्त्रपाते ॥२७॥ जों घे दशानन असा व्यवसायकानी । दापूनि त्यास रघुनायक सौंयकांनी ।। भेदानि ऊर वधि आननि रक्त नाकी । जैसा व्यथे सुकृत संचित रिक्त नौकीं।।२८।। रघुपति विजयी त्या रावणातें वधूनी । श्रमबहु परि केला राक्षसांच्यावैधूनी ।। शुक मग विभुली ला दिव्य जे तीस वर्णी । स्वैपितृकृत वदे हे श्लोक बत्तीसवर्णी ।।२९।। श्लोक वृत्त कथिले यमकांनी । गाति त्यांस न पडे यम कानीं । पाव तील रघुनाथपदाते । जे सदा स्मराति नाथपदाते ॥ ३० ॥ अष्टाक्षरी चरण तो यमी न साजे । लीला च त्यांतिल सुखावह मानसा जे ।। नेत्रांस ही दिसति ज्यास बरे कदापी । की काळ मृत्युस तदर्थ चि एक दापी॥३१॥ समश्लोकीमध्ये रघुपति करीतो नियम की कथावे श्लोकार्थ स्वगुणरचनायुक्त यमकी ।। अनुष्टुप्पद्याते म्हणुनि विषदच्छंदै निरी करीतो रामाचे चरण शिरि ते वंदुनि करीं ।। ३२ ॥ मता राक्षसाचीचिया वृंदसेना । रडे आफळे अंत दुःखा दिसेना ।। स्त्रिया आणि मंदोदरी शोकरीती । निघोनी पुरींतूनि भारी करीती ।। ३३ ।। मेले सुमित्रात्मजसायकांनी । आलिंगुनी त्यांस हि बायकांनीं ।। केला बहू शोक अनेक रीती । उच्च स्वरें रूदन ज्या करीती ।। ३४ ॥ ३८ निशाचरचम राक्षससेना. ३९ मरुत्सुत वायुपुत्र (मारुती). १० ऋक्ष-आस्वल. ४१ मेघनीळ घनश्याम. ४२ तोमर शस्त्रे विशेष. १३ चतुरंग-रथ, घोडा, पायदळ, व हत्ती हे चार प्रकार जीत आहेत अशी. १४ सीतापहारकदळी रावणाचे सैन्यांत. १५ सुरेंद्ररथ इंद्राचा रथ. ४६ परोक्ष-नकळत. १७ नित्रप-निर्लज्ज. १८ अमोघ-सफळ. ४९ व्यवसाय उद्योग. ५० सायक-बाण. ५१ व्यथे-दुःख पावे. ५२ नाकी स्वर्गी. ५३ वधूंनी बायकांनी. ५४ विभुलीला रामाची लीला. ५५ स्वपितहत शुकाचा बाप व्यास त्याने केलेले. ५६ बत्तीसवर्णी ज्यांत बत्तीस अक्षरे आहेत असे अनुष्टुप छंदाचे श्लोक. ५७ छंद वृत्त, ५८ निकर=समुदाय,