पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१४) वामनपंडितकृत सीतास्वयंवरगृहीं भैवचाप हाती । भंगी मुख क्षिति वीर अहो पहाता । लोले करूनि गजबाळक इदंड । मोडी तसा भय करी ध्वनि तो उदंड ।।११।। जिंकोनि ने स्वगुणरूपवये समान | सीता रमा स्वदृदयावरि लब्धमान ।। निःक्षत्रिया क्षिति करी हरि गये वाटे। त्याच्या जया नपतिबीजै असह्य वाटे॥१२॥ जो स्त्रीस लंपट सकाम तथापि त्याची । मायां धरूनि करि गोष्टि खरी पित्याची।। राज्यादिके त्यजुनि जाय वनास दार। पाणावरी जित चि मुक्त जसा उदार।।१३।। लंकापती भगिनिया मुखदूषणाते । केले महारण तया खरदूषणाते ।। मारी चतुर्दश सहस्र हि चाप हातीं । कोदंडे चंड वनि कष्ट मनी पहाती ॥१४॥ सीताकया परिसतां स्मरविव्हळाने । जो निर्मिला दशमुखें मग हो खळाने ॥ मारीच तो युधिं तया प्रभुकार्य दक्षा | जाऊनि दूरि शिव संहरि जैवि दक्षा ।।१५।। तो राक्षसाधम हरी जनकात्मजा ते । नेता के जसि जा प्रतिदीन जाते ।। तेव्हां वनी रघुपती अति शोक दावी । की स्त्रीप्रियास गति शेवटि हे वदावी।।१६।। जातां खकार्य मृत देह कबंध मारी । जे मित्र होति कपि शोधुनि भूकुमारी ।। वाळीवधा उपरि सांगति ते च वेळे । ये विश्ववंद्य मग त्यां सह तो सुवेळे ।। १७ ।। सक्रोधलोचनभये चि पडे समुद्रा । आंदोळतां जळचरें अति मौन मुद्रा ।। जाला समूर्त शिरिं घेउनि पूजनाते । ये पाय वंदुनि वदे भवभंजनातें ॥ १८॥ जो तूं अनंतसम जो न कुबुद्धि त्यातें । कूटस्थ आदि पुरुषा जगपाळित्यातें ।। देव प्रजाधिपति भूतपति क्रमाने । मायापती स्रजिसि सत्वरजस्तमाने ।। १९॥ माने तसे जलधिते अजि लछि माते । श्री पाव मारुनि पुलस्त्यसुताधमाते ।। पाषाण तारि पसरे यश जेंवि लोकीं । गातील कीर्ति नृप सेतुपथा विलोकी ।। २०॥ सुग्रीव नीळ हनुमंत कपींद्रसेना । ते आणितां गिरिशिखा नभ ते दिसेना ।। त्या सेतुने रघुपती कपिदग्ध लंका । देखे बिभीषण वदे मति निष्कलंका ॥२१।। चष्ट्रानि ते नगरि वानर ते निघाले । लंकेत घालिति गृहादि करूनि घाँले ।। हस्ती जसे डहुळिती हदिच्या जळाला । देखोनि रावण अहो हृदयीं जळाला ॥२२॥ पुत्र प्रहस्त अतिकाय विकंपनादी । धूम्राक्ष दुर्मुख दिशा भरिती स्वनादी । सर्वांस त्यांस सह कुंभ निकुंभ धाडी । तो कुंभकर्ण हि उठे जग झोडि धाडी।।२३।। २३ भवचाप-शिवधनुष्य' २४ क्षितिप-राजे. २५ इक्षुदंड ऊस. २६ नपतिबीज= राजांचे बीज. २७ सदार-स्त्रीयुक्त. २८ लंका- पतिभगिनी-रावणाची बहीण (शर्पनखा) २९ कोदंड-धनुष्य, ३० प्रभुकार्यदक्ष प्रभु रावण त्याचे काम करण्याविषयी कुशल. ३१ वृक-लांडगा. ३२ अजा-शेळी, ३३ समूर्त सशरीर. ३४ भवभंजन-संसारनाशक (राम). ३५ शिखा-शिखर. ३६ घाले-हले. ३७ हद डोह पाण्याचा.