पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संकलित रामायण, (२१३) भ्रमरमन पैदाब्जी पाववी त्या विरामा भव हर भवचापध्वंस विश्वाभिरामा ।। १ ॥ जगी तूं असा की घटी एक माती । गुण श्लोक कोटींत तूझे न माती । निरूपीन त्या सिंधुच्या बिंदुमात्रा । पुरे ते चि संसाररोगास मात्रा ॥ २॥ महा औषधांतान थोडे चि काही । करी सेवितां नाश वातादिकां ही ॥ पुरे आमची हे अविद्या मराया । तुझे एकले नाम जी रामराया ॥ ३ ॥ जरी नाशिली आमुची जी अविद्या । जितां ही दिली मुक्ति देऊनि विद्या । तुझी कीर्ति मुक्तीहुनी गोड वाटे । शुकादीक ही चालती याच वाटे ॥ ४ ॥ म्हणोनि जे भागवती शुकानें । लीला तुझी वर्णिलि कौतुकानें ।। टीका तिची मी क्षितिलोकवाणी । करीन जेथे न सुखास वाणी ॥ ५॥ बहू ग्रंथीं वृद्धी न करुनि वदावी यशसुधौ । प्रतिश्लोकी जे कां करि अमृतसंतृप्ति वसुधा ।। समश्लोकी टीका म्हणुनि करितो जी रघुपती । जिला मंत्रप्राय स्मरति वदती लोक जपती ॥ ६॥ निजाश्रमा राघव कौशिकाने । नेला कथा तेथुनि हे शुकाने ॥ आरंभिली मंगळ त्यास गातें । गातो मुनी उद्धरि जो जगातें ॥ ७॥ चाले वना प्रति पुलस्त्यसुतास मारी | पाळी चकोसल घरा सह भूकुमारी ।। या मंगळाचरणपद्यरसे शुकानें । संक्षिप्त वर्णिलि कथा प्रिति कौतुकाने ॥ ८॥ टाकी तातार्थ राज्यावन वन विचरे त्या पदी ज्यास वाटे । सीताहस्ताब्ज भारी अनुज कपिर्पती सेविती नित्य वाटे॥ बोले निर्नासिकेच्या अंसुर जनकजा ने तई क्रोध लेशे । बांधी दापूनि सिंधू वधि रिपुकुळ त्या राक्षजे कोशलेशे ॥ ९॥ अहो विश्वामित्र दशरथ नृपा प्राथुनि जयीं । स्वयज्ञाते नेला प्रभु असुर मारूनि विजयी । तया संगें जातां करूनि मिथिला ग्राम गमनीं । शिळा शापे मागें करि पदरजे हंसगैमनी ॥ १० ॥ ५ अब्ज कमल. ६ अभिराम सुंदर. माती-मावती (राहाती). अविद्या=अज्ञान. ९ क्षितिलोकवाणी देशभाषा (मराठी भाषा). १० वाणी कमताई. १३ सुधा अमृत. १२ टीका भागवता नवव्या स्कंर्धात संक्षित रामायण आहे त्याची ही टीका होय. १३ कौशिक-विश्वामित्र. १४ पुलस्त्यसुत-रावण. १५ कोसल-देशविशेष. १६ भकमारी सीता. १७ अवन रक्षण. १८ कपिपति-वानरस्वामी (सुग्रीव). १९ निर्नासिका जिचे नाक कापिलें आहे अशी शुर्पणखा. २० असुर राक्षस (रावण). २१ जनकजाजनकाची कन्या (सीता). २२ हंसगमनी-स्त्री.