पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१२) वामनपंडितकृत हे क्लिष्ट वाक्य पडतां श्रवणीं विलोकी । सूर्याकडे मग म्हणे मुख केंवि लोकीं ।। दावू अतःपर करूं न शके पणातें । हे वाक्य सत्य करि होमिन आपणातें ।।१९।। अच्यूत हे समजला जगदांतरात्मा । बोले शतकत्सुताप्रति तो महात्मा ।। कां धाकलास इतक्यांत चि या वधाया । पाहे कशी रचितसें निज योगमाया ॥२०॥ तुझे उणे या स्वजनी दिसावें । रथीं तुझ्या म्यां मग कां बसावे ।। मनी असे कार्य तुझे सजावें । उगेचि वाटे मज तूं खिजावे ।। २१॥ साधावया अर्जुनकामनेला । अस्तासि मार्तंड निकाम नेला ॥ प्रमोद जाला धृतराष्ट्रजाला । की आज हा सैंधव वीर झाला || २२ ॥ समीप आले नृपलोक सारे । पाहों मरे अर्जुन हा कसा रे ।। कोणी नरासी करिती खटाळी । ते मारिती हांसुनि मूर्ख टाळी ।। २३ ।। पार्था वो रवि हा जयद्रथ हि हा हे लक्ष लावी बरे ।। बोले अर्जुन लाविले हरि वदे मारी जगच्छेखेरें ।। ऐसे त्याप्रति बोधितां झडकरी त्या सैंधवाचा गळा ।। गेला तोडुनि अर्धचंद्र विशिखें की मस्तका वेगळा ।। २४ ।। आधीं च पार्था सुचवोनि देवें । तो वारिला योग हि वासुदेवें ।। तो देखिला भास्कर सैनिकांहीं । उपाय तेव्हां न चले चि कांहीं ।।२५।। दुर्योधनादिक सशोक सलज्ज जाले । त्यांचे प्रमोदभरदीपक ते विझाले ।। केला जई विजय दुर्जय वासुदेवे । हे वाचिजे हरिकथामृत की सदैवें ।। २६ ॥ श्रीशक्ति कर्ण मग भीमसैंतासि मारी । त्याचा प्रताप बहु तीव्र विरांसि मारी ।। ते आयका वदत वामन लीन वाचा । मेला पुढे तनय द्रोण अशी कुवाची ॥२७|| वामनपांडतकृत संकलित रामायण.* करिति चरण तुझे जे शिळी दिव्य रामाँ हरुनि दुरितं माझें होउ ते सौख्य रामा ।। ५६. शतक्रतुसुत=इंद्रपुत्र अर्जुन. ५७. मार्तड–सूर्य. ५८. जगच्छेखर=कृष्ण. ५९. सेंधव जयद्रथ. ६०. विशिख-बाण. ६१. भीमसुत घटोत्कच. ६२. यावरून घटोत्कचवध व द्रोणषध ही प्रकरणे वामनाने रचली असावी असा ध्वनितार्थ निघतो. १ संकलित संक्षिप्त. * हे प्रकरण मौजे चिंचोडी तालुके खेड जिल्हा पुणे एथील देशपांडे यांजकडे मिळाले. त्यांचे एथें वामनी प्रकरणांची एक चांगली लिहिलेली व सकलादीने बांधलेली वही आहे. तींत वामनी प्रकरणे आणखी पुष्कळ आहेत. परंतु ती सर्व पूर्वी छापून प्रसिद्ध झालेली आहेत. २ शिळा=अहल्या शिळा. ३ रामा-स्त्री. ? दुरित-पाप.