पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जयद्रथवध. (२११) सोडी बाण अनेक पार्थ समरी बाणासि ने मस्तकीं । वीराचा शर एक ही न चुकता लागेच नेमस्त कीं ॥ ८॥ सव्यापसव्यकृतसायकतांडवाने । केले पराजित रणी रण पांडवाने ।। घालू शके कवण या वरि वीर घाला । जैसा मृगांत मृगरीज तसा निघाला ॥९।। कौंतेयाप्रति देवकीय बदला हे भागले वाह रे । जाले फार तृषार्थ यत्न करणे जेणे पिपासा हरे॥ बोले पार्थ जळासि यासि जपतो मी वारुणास्त्रा रणीं ॥ या वीरांस हि वारितो गज जसा सक्रोध आधोरणीं ॥ १० ॥ तत्काळ वापी रचिली च पार्थे । वारोनियां वीरबळे अपार्थे ।। केले युगौंपासुनि मुक्त देवें । सवे चि ते घोटक वासदेवे ।। ११ ।। आर्द्रप्ष्ट हय पाजुनि पाणी । दो करी चतुर नीरजपाणी ।। देखती कुतुक सैनिक सारे । बोलती प्रबळ पार्थ कसा रे ॥ १२ ॥ धो धो दुंदुभि वाजल्या उचलला सैन्यी धुरोळा नभा ॥ गेला सर्व दिशा तमोमय पहा जाला रखी हीनभा ॥ मारावा व्यसनस्थ पार्य वदती आहे रथावेगळा ।। होतां सज्ज कदापि हा न उतरे काळाचिया ही गळां ।। १३ ॥ राजे भद्रप शाल सैंधव शिबी गर्तकांबष्ट जे॥ होगंध्रांग कलिंग बंग यवन प्राग्ज्योतिषावंत जे ।। इत्याद्यद्भुत कोप कोपनिभृत स्वाकर्ष चाप स्वरें ।। आले सन्मुख ते क्षणीं विमुख ते केले प्रतापे नरें ।। १४ ॥ शाखामृगध्वज बहूत विशाळ वाटे । यासी भिडाल तरि लाविल मृत्युवाटे ।। गांडीव मुक्त शर वाजति हे सणाणा ॥ ऐसा धनुर्धर कसा स्वमनासि नाणा ।।१५॥ कां उकावत असा परतावे | आमुच्या तरि मते परतावे ।। गर्जतो बिजय दुर्गम रावें । कां अशासि खवळोनि मरावे ।। १६ ॥ संजोगिले तुरग शीघ्र रथासि देवें । केले पहा सुकृत पांडुसुते सदैवें ॥ दे हात पार्थ चढतां स्वरथावरी तो । एक्या करें हयचतुष्टय सांवरीतो ॥ १७ ॥ होता असा अरुपदाहक कैठभारी । बोले नरा मन तुझे न भया उभारी ॥ अस्ताचला स्वतिलकीकृत भानु गेला । वेड्या जयद्रथ वधास्तव तूं भकेला ।।१८।। ४९. मृगराज-सिंह. ५०. पाह=घोडे. ५१. पिपासा-तहान. ५२. युग-जू. ५३. घोटक-घोडे. ५४. शाखामृगध्वज-वानर आहे ध्वजाच्या ठायों ज्याचा असा अजुन ५५, राव-शब्द.