पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१०) वामनपंडितकृत-जयद्रथवध. पूसी मुखांब जननी नयना स्वधारी । दावी असें कपट नाटक सूत्रधारी ॥१४॥ मी नंदनंदन शिशु व्रजभूमिवासी । हे नाठवे निज हिता नत बांधवासी ॥ की मीच राघव अशी गति दाखवीतो । आनंदनंदन विभू रस चाखवितो ॥१५॥ इति श्रीबाळचरित्र संपूर्ण ।। वामनपंडितकृत जयद्रथ-वधाम सौभद्रशोकविवे शें रचिले पणाते | कुंतीसुते समजल्या विण आपणाते ।। ते वाक्य सत्य करवी तव पूर्वजाचें । श्रीकृष्ण नाम भज त्यासि अपूर्व ज्याचें ।।२।। मी मारीन जयद्रयासि समरी जों भानु आहे नभी । नाही होमिन देह हा हुतवहीं सर्वात्मना ही नभी ।। ऐसें बोलुनि वाक्य त्या परिस तो केला असा नेम रे। रखू त्यासि बळे घडो मग तसे तो वापमाने मरे ।। २ ॥ यानंतरे जथुनि कौरवराजसेना । आली कसी अवनिमंडळ जे दिसेना ।। तो पार्यसैन्य हि सर्वेचि निघे रणाला । ज्या इंद्र ही परि नव्हे क्षणवारणाला।।३।। सूचीव्यूह तयांत पद्म रचिले राहे तदभ्यंतरीं । राजा सैंधर्व तो जयद्रय तरी चिंता करी अंतरी ।। व्यूहाच्या वदनी कृतांत समसा आचार्य राहे बळे । जे जे ज्या स्थाळं ठेविले नपवरे ते राहिले तुंबळें ।। ४ ।। वदे कृष्ण पाहे नरा द्रोण हा रे । समच्छास्त्रंवत्ता रणी जोन हारे ।। जयाचे शेरेव्रात भात्यांत कोरे । तयाशी वृथा झुंज लाचूं नकोरे ।। ५ ॥ पंचाशीति जयासि वर्षगणना आपांडुता मस्तकीं। युद्धी द्रोण तथापि दुर्धर दिसे हस्ती जसा मस्त की ।। पार्था तूं न भिडे तयासह नको तो आजि नाटोपतो । पाहा दुःसह वाटतो मज रणी याचा खटाटोप तो ।। ६॥ नमस्कार दूरोनियां सव्यससँची । करी बाणयोगे गुरूला तसाची ।। सवेगे पुढे तो पृथापुत्र धांवे । यदर्थ प्रतिज्ञा तयाते वधाचे ।। ७ ।। आले वीर समस्त धीर धरुनी जे सैनि कीर्तिस्वरे । कोपाविष्ट विशिष्ट दीप्ति मिरवे ज्यांची सुवार्तस्वरें ।। ११. सौभद्र अभिमन्यु. १२. शोक विवश-दुःखाधीन. १३. हुतवह=विस्तव. १ 2. सैंधव-सिंधु देशचा. १५. शरव्रात बाण समुदाय, ४६. पंचाशीति=पंचायशी, १७. आपांडता= पांढरे केस. १८. सव्यसाची अर्जुन.