पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालचरित्र, (२०९) फिरसि कां उगा पाठिसी हरी । सरसिजानना सांग लौकरी ।। हरि म्हणे मला घेउनी कडे । स्थिरपणे उगे बैस ईकडे ॥ ४ ॥ जननि हांसली खदखदां तदा । सकळ काम हे मी करूं कदा ।। करिसि कां बहू छंद बा उगा । उठ मुलांसवे खेळ जा उगा ॥ ५ ॥ जा जा खेळ मुलां सर्वे मज नको का जेविसी ते नको । कृष्ण दूध पिसी नको निज घरा बाहेर येसी नको ।। चेंडू देउं तुला नको निजविते ये ऊठ ते ही नको । नारी ह्या तुज नोवऱ्या करिन मी तेव्हां म्हणेना नको ।। ६ ।। हूं हूं यशोदे मजलागि ते दे । राधे उरी कंचुकिमाजि ते दे ।। हांसोनि बोले जननी यशोदा । मागों नये रे उगला मुकुंदा ।। ७ ।। कृष्णा घेउनि कडे निज सैंया । चालिली नयननिर्जितपद्मा ।। हालवी जननि पालेख शय्या । सज्जनी सरस गात जि जो या ॥ ८ ॥ निजेला की जागा म्हणुनि जननी जो निरखिती । दयाब्धीची मूर्ती तंव उघड नेत्रीच दिसती ।। कशी येना निद्रा तुज गुणसमुद्रा यदुपती । पुन्हा गाऊं लागे तंव वदत देवो मृदुगती ॥ ९॥ माते मला झोप न ये चि कां की । तूं काहणी सांगसि पूर्विकां की ।। तेणे गुणे येइल नीज माते । निजेलिया या पुरुषोत्तमाते ।। १० ।। कृष्ण मूर्ति किति सुंदर शाहणी | सांगणे म्हणत पूर्विल काहणी ।। हालबी जननि पालख माउली । ते कथा वदत शीतळ साउली ।। ११ ।। होता राम म्हणोनि हूं क्षितिसुता तत्पत्नि हूं तत्पिता । वाक्ये दंडक हिंडतां दशमुखे ते चोरिली योषिता ।। निद्रेलागि कथा अशी जननि ते सांगे हरी ऐकतां ।। दे दे बाण धनुर्धनुष्य अनुजा बोले उठे तत्वतां ।। १२ ।। यावें शंकरजी बसा अजि असे डावीकडे धातया । स्कंी क्षेम सुराधिपा कुशल की वित्तेशजी येथ या ।। ऐसा शब्द निजेलिया हरिचिया माता मुखी ऐकुनी । कां कांवोसणसी मुला म्हणउनी धू धू करी घेउनी ॥ १३ ॥ जागे करी जननि त्या गरुडध्वजाला । तो बैसुनी मुदित सावध शीघ्र जाला ।। ३४. सरसिजानन कमला सारखे तोंड आहे ज्याचें असा. ३५. सम=घर. ३६. नयननिर्जितपद्मा=डोळ्यांनी जिंकलें आहे कमल जीने अशी. ३७. पालख पाळणा. ३८. स्कंद-कार्तिकस्वामी. ३९. क्षेम-कुशळ. ४०. वित्तेश-कुबेर.