पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०८) आनंदतनयकृत बालचरित्र. न दावितां दाटुनि होय चोरी । म्हणोनि जाऊं तरि जाय थोरी ।। आतां करूं काय जना समोरी । टाकू कशी मां हंसताति पोरी ॥ २७॥ वक्षोडगोळ अळुमाळ तेमालनीळे । लसूनि मंद रुदना कारजे सुशीळे ।। माता म्हणे रुदसि कां लटके वदोनी। चेंडू तुझा उसळला न कळे उडोनी ।।२८।। हरि म्हणे अमये कमळेक्षणा । जरि पटा उकलील सुलक्षणा ॥ हरपला इशि कंदुक सांपडे । अनृत हें न वदें धरणी पडे ।। २९ ॥ तो ते गोपवधू विधूतवसनी सोडी "निवीग्रंयिका । झाडी वस्त्र पुनः पुन्हा गमतसे आश्चर्य या पांयिका. ।। चेंडू भव्य पटींहुनी क्षितिती अंदोळला कौतुके । देखोनी जन हांसती खदखदा आले तदां जीतुके ।। ३० ।। गोपी तदा विसरली तनुभावनेला । कृष्णे तिचा निजगुणे तनुभाव नेला ॥ ऐशी चरित्ररचना रचिजे अनंते । संसारसिंधु तरिजे चि जगें अनंतें ॥ ३१ ॥ ज्याची अतर्य करणी धरणीघराला । ठावी नसे अजि तया करुणाकराला ।। ज्या गौळणी प्रियतमा हृदयाभिरामा । आनंदनंदन म्हणे वरिताति रॉमा ।। ३२ ॥ ।। इति श्रीकंदु काख्यान समाप्त ।। तुका आनंदतनयकृत बालचरित्र. यादवेंद्रचरितामृत सेवा । लोक हो श्रवण सज्जुनि सेवा ।। त्या सुखे तुह्मि नमाल जगी या । भारती अनि यदर्थ मदीया ।। १ ।। नाना छंद करी हरी व्रजपुरी बालस्थिती आदरी । मातेला पदरी धरी निज करी मोत्यांचिया झालरी || ज्याचें नाम उमा सदाशिव सदा जो चितिती अंतरीं । तो हा कृष्ण विभू जपे जननिची नामावळी साजरी ॥ २ ॥ घरा येतां जातां दधि घुसळितां पाक करितां । विडे घेतां देतां सहज दुहितां दुग्ध भरितां ।। नदी पाण्या जातां जन निरखितां ही परिसतां । फिरे माते मागे पदर धरुनी छंद नसता ।। ३ ॥ २७. वक्षोज-स्तन. २८.अळमाळ-किंचित. २९. तमालनीळ-तमालपत्रासारखा निका.३०. वसन-वस्त्र. ३१. निवी ओढीळ. ३२. धरणीधर-शेष. ३३. रामा स्त्रिया.