पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कंदुकाख्यान. (२०७) नेणे चि मी काहिं विदोष दोषा । ते भीत बोले पछाळयोषा र तेव्हां तया सज्जनलोकपोषा । माता दटावीत वदे सरोषा ।। १५ ।। दटाविते माय तया हरीतें | चरित्र ज्याचे दुरितें हरीते ।। मारावया धांवलि कृष्णजीते । तो वाटला व्रात्य अचाट जीते ॥ १६ ।। व्रजांगना सांगत येत होत्या । यथार्य वार्ता गमल्या अहो त्या ।। मारावया घे मग फोक हाती । समग्र ही लोक तया पहाती ॥ १७ ॥ पशुपयुवति ऐशी दाटली लोकराजी । अनिमिष नयनाने पाहती श्रीधरा जी ।। तंव हरि जननीते स्फुदस्फुदोनि सांगे । अमइ निरखिली म्यां चोरटी चौदिसां गे ।। १८ ।। हे अशी च अमणी करि चोरी । मागतां प्रगट ते शिरजोरी ।। नंदसुंदरि म्हणे तिजलागीं । कां असे करिसि होसि बजागी ।। १९ ॥ तेव्हां व्याकुल ते वदे कुळवधू हा शब्द माझ्या कुळा । कल्पांती न लगे चि मां सहज मी जातां घरा गोकुळा ।। याची मात खरी म्हणनि धरितां हे आण घ्या मामिसें । नेणे कूड कदापि मी करि हरी विस्तार नस्त्या मिसे ।। २० ।। अम्ही सर्व मुले बिदीत अमई चेंडूफळी खेळतां । अभ्री उंच उफाळला क्षितितळी तो येथ आंदोळतां ।। तो आला इचिये घरी मग इणे चोरूनियां ठेविला । नेदी मागति मागुता म्हणुनियां चैलांचळी गोविला ॥ २१ ॥ अगइ सत्य वदे किति वरेवरी । गमतसे सकळांस हि ते खरी ।। हरि वदे मनिं कल्पुनि मामिसे । मज धरी पदरी भलत्या मिसें ॥ २२ ॥ करूनियां विक्रय गोरसाचा । मी ये घरा भाव असा च साचा ।। याचा मला कंदुक तो न ठावा । माझ्या कुळा बोल असा उठावा ।। २३ ।। रोषे वदे शपथपूर्वक सौरसाक्षी । नेणे चि मी कपट कृत्रिम भूमि साक्षी ।। मिथ्या कदापि न वदें चि म्हणे मुरारी । चेंडू इच्या जवळि साक्ष असे पुरारी ।।२४।। वक्षस्थळी सहज उन्नतता स्त्रियांसी । है तो तुह्मां विदित संशय कासयासी । चेंडू म्हणूनि बहुधा भ्रम या मुलाला । नाही ह्मणोनि उचकीन करें फुलाला ।।२५।। हरि म्हणे जरि सोडिल कंचुकी । तरि धरेस पडेल नव्हे चुकी ।। वजवधू मग दाखवि ते घडी । कुचपटा चळचंचळ ऊघडी ॥ २६ ॥ २४. वैखरी वाणो. २५. कंदुक-चेंडू. २६. सारसाक्षी कमला सारखे आहेत डोळे जीचे ती.