पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०६) आनंदतनयकृत ते सोडवी धरुनि अंचळ चंचळाक्षी । वोढी बळें स्वबळ बांधव लोकसाक्षी ।। पायीं तुझ्या हरि पडेन म्हणे कृपाळा । रे सोडि सोडिं मज फार उशीर जाला ।।६।। मी योषिता वंशधरा सुशीळा । कां झोबसी वंशधरा सुशीळा ।। शौरी म्हणे मानवतो अशोलों । न स्वीकरी मानव तो अशीला ।। ७ ।। प्रार्थी गोपशिखामणीस रमणी गोपीगणी तूं धनी । राणी हे करणी उणीव सखया कोणी गणीना धनी ।। पाण्यालागुनि गौळणी बहुजणी येतील येथे झणीं । चोठी त्या धरितील तूज तरुणी होती मला गांजणी ।। ८ ।। ऐशी बोलत ते उभी हरि न भी ते भीरु पाहे दिठी ।। हा अभीर गभीर भूपति असा सोडी च ना ते मिठी ।। ते वोढी परि हा न सोडि च गडी ते हात जोडी सती । ते जोडी मज भासते स्मररती दोघे तशी दीसती ।। ९ ।। येरीकडे नंदवधू यशोदा | धुंडी तया भक्तदेयायशोदा ।। खेळावया बाळक संगसंगें। गेला असे क्रीडत रंगरंगे ।। १० ।। निघाली बाहेरी हुडकित हरीतें चहुंकडे | फिरे नाना मार्गी करि धरुनि त्याचे संवगडे ।। पुसे ज्याला त्याला तुझिं निरखिले मूल सखये । उठावे खेळाया सहज गुण त्याचा जगति ये ।। १२ ।। ऐशी शोध करीत हंसगतिने लंघीत आली पथा । तीते देखुनियां दुरी मग हरी लीला करी अन्यथा ।। गोपीते पदरी न सोडि च करी लोळे धरारंगणीं । दावी स्फंदन मंद रूदन मुखीं भांबावली गौळणी ।। १२ ।। आला राग तिला म्हणे युवतिला कां गे खट्याळे कशा ।। नाही लाज तुला मुलासि धरुनी रानी उभी ठाकसी ।। नेणे काहिं च मी स्वभाव-गतिने मामी घरा जातसे । मार्गी हा पदरी धरी मज हरी नेणा तुम्ही कां तसें ।। १३ ।। श्रीहरी परम स्फुदत लोळे । वाप्पयुक्त बहु दाखवि डोळे ।। वाटला कळवळा जननीला । घे कडेवरि तदा घननीळा ।। १ ।। १६ योषिता स्त्री. १७. वंशघरा=कुलीन. १८. वंशधर मुरलीधर. १९. अशीलाअशा प्रकारचीला. २०. अशीला=शील रहित झणजे वाईट स्वभावाची. २१. गोपशिखाम णि गवळ्यांत मुख्य (कृष्ण). २२- आभीर-गवळी. २३. भक्तदयायशोद--भक्तांवर दया करून त्यांस यश देणारा. * मामी=सासबाई.