पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥श्री ॥ विठ्ठलकत बिल्हण चरित्र. श्रीवीरसेन नूप गुर्जर-देशवासी । वास्तव्यपूर नळपट्टन नाम त्यासी ॥ पृथ्वी समुद्रवलयांकित कीर्तिदाता । विद्या-विशारद महा श्रुतिशास्त्रवक्ता ॥ १ ॥ पट्टांगना नपतिची विमलाभिधानी । बाला अवंतिपुरिची वरभोगदानी ॥ कन्या तिची विमल चंद्रकला प्रदीपा । जाणा तयेवरि असे जनकार्नुकंपा ॥२॥ देश प्रजाजन सुखी बहु पूरवासी । राँका निशानगर सत्य गमे जनासी ।। देखोनि लोक ललनेसि गवाक्षपंथे । नेणे दिवा उगवला मुखचंद्र जेथे ॥३॥ चंद्रोपमा शशिकला वयवृद्धि पावे ।। क्रीडार्थ ये निजसभेप्रति तातसेवे ॥ कंदर्प-सिंधु-लहरी जशि दिव्य कांता । देखे पिता करि सुताध्ययनार्थ चिंता ॥४॥ राजा वदे प्रतिदिनी स्वपुरोहिताते । चिंता मनीं निजसुताध्ययनार्थ माते ।। जाणे कवित्व गुणमंडित शास्त्रवक्ता। घेऊनि ये करिन संग्रह बुद्धिवंता ॥ ५॥ चिंता करी नप-पुरोहित तो स्वभावें । काश्मीरदेश-कवि बिल्हणमिश्र नावे ॥ देशावरास्तव तया नगरास आला । सन्मानिला द्विजवरें सदनासि नेला ॥६॥ स्वस्थान देश कुळदैवत बिल्हणाते। मंत्री पुसे कुशळ सर्व ह्मणे तयाते ।। विध्युक्त पूजन करोनि पुरोहिताने । १ निपुण. २ कृपा. ३ पूर्णिमा. ४ शास्त्रवेचा' असें पाठांतर आहे.