पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • आनंदतनयकृत

कंदुकाख्यान. कोणी ते प्रेमदा तया ब्रेजपुरा जातां रणन्नपुरा । तेथे ये त्रिपुरारिचा प्रियसखा तो योग वान पुरा ।। शोभे कल्पतरूतळी करतळी पांवा तथा मोहरी । वाहे मंजुळ कंजलोचन जना नांदे हरी मोहरी ॥ १ ॥ ज्याची भासुर भी प्रभाकर-निभा व्यापूनि लंघी नभा । तो हा संतसभाभिवंदित उभा ते दिव्य देखोनि भा । भ्याली बल्लववल्लभा मग ईभा ऐशी रमावल्लभा । चाले दूरुनि हा धरील म्हणुनी शंके जगदुर्लभा ।। २ ।। याची सदां समजते बरि लोकलीला | माते करी धरिल देखुनि येकलीला ।। चाले चुकावुनि पुढे चमकोनि घोषः । बिंबाधेरा शशिमुखी पिकमंजुघोषा ॥ ३ ॥ भ्याली पुढे सरकली गजराजचाली । कित्येक दूर पथ लघुनियां निघाली ॥ ये पाठिशी हरि दयाघन मंद बाहे । जातां विलोलनयना परतूनि पाहे ॥ ४ ॥ परतुनि जैव पाहे गोकुळा जातजातां । निकट चि हरि आला वंद्य जो वेदसंतां।। पदर धरुनि तीचा जो उभा ज्ञानगाभा । पशुपयुवति जाली पात्र चिद्भाग्य लाभा ।।५।।

  • विजापूर तालुक्यांत आनंदराव नांवाचा अरणीगांवचा कुळकरणी होना, त्याचा पुत्र आनंदतनय. हा शिवाजीचा बाप शहाजो याचा गुरु होता असे म्हणतात. ह्याची यमकबद्ध कविता असून पदेंहो पुष्कळ याने केली आहेत. शिवाजीचा जन्म शालिवाहन शके १५४९ त झाला त्यामुळे त्याचा बाप जो शहाजी त्याचा गुरु आनंदतनय हा सोळाव्या शतकाच्या आरंभीच असला पाहिजे असे दिसते. बहुत करून अरणीकर आनंदतनय व पैठणकर एकनाथ स्वामी (शके ११७०-१५३१ ) हे उभयतां समकालीन असावे असे वाटते. पंत या कवीच्या यमकरचनेविषयीं ह्मणतात की:--

आनंद-तनय अरणीकर शोभवि फार कवन यमकांहीं । तत्सूक्ति पाठ ज्याला त्याचे पाहे न भवन यम कांहीं । सन्मणिमाला. १. प्रमदा स्त्री. २. ब्रजपुर गोकुळ. ३. रणन्नपुरा खुळखुळत आहेत पैजणे जोची अशो. ४. त्रिपुरारि शिव. ५. वान-व". ६. कंजलोचन-कमलासारखे आहेत डोले ज्याचे. ७. भासुर तेजस्वी. ८. मा कांति. ९. प्रभाकर सूर्य. १०. बल्लववल्लभा-गव न्याची स्त्री. ११. इभ हत्ती. १२. घोष-गवळवाडा. १३. बिंबाधरा-तोंडल्यासारखा आहे खालचा ओंठ जीचा अशी. ११. पिकमजघोषा-कोकिलासारखा आहे मंजुल स्वर जीचा अशो. १५. गजराजचाली-उत्तम हत्तीसारखी मद आहे गति जीची अशी.