पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चंद्रावळी-आख्यान. (२०३) धन्य तुझी करणी हे कृष्णा जननी तुतेचि हो व्याली ।। व्रजजन यापरि सर्व हि गाती विटंचौर्यशौर्यवोव्याली ।। ८६ ।। तुटती यातायातें जे नर मज ते अनन्य वोळगती ।। निरसुनि दुरहंकृतिते देइन त्यांतें सखे विशाल गती ।। ८७ ।। बकशकटादिक कपटा ब्रौद्रकृता निवारि घोर्षांच्या ।। उभवति कामें गुढिया उभवति इहपर सुकीर्ति घोषाच्या ॥ ८८ ।। यमनियमाद्यष्टांगें जे पद न मिळे महर्षि सिद्धांतें ।। ते गोपीप्रति दिधले धुंडिति जे शास्त्र वेद सिद्धांत ।। ८९ ॥ यापरि करुणापांगे सुख करि अज्ञान बंधुरा जीवा ।। तोषवि सर्वां जैसा समुदित तिपत्रबंधु राजीवाँ ॥ ९० ॥ बहुविध युक्ति विचारे बोधुनि औंभीरभीरु मौकांते ।। दर्शवितां निजरूपा त्यअिना मग सर्वहि भ्रमा कां ते ॥ ९१ ।। चंद्रावळिसह सुरतें मिली राहुनि तिचे गृहीं दोषी ॥ जगदीशे या कलिच्या विलया ने जो समग्र ही दोषा ।। ९२ ।। आश्वासुनि गोपस्त्री अभिरत जी कांत नाथ गोकुळिंचा ॥ निजसदना प्रति जाया उठिला निस्तुल शिशू शशीकुळिचा ।। ९३ ॥ शिशुपालांतक शिशुते अवघ्या जागे करुनि वेशाला ।। सोडुनि सत्वर गेला सार्भक सूर्योदयीं निवेशाला || ९४ ।। हरि तो प्रातःकाळी कालिंदिती निकुंजकांतारी ।। गोप शिशंसह विहरे जो निजभजनेचि भाँउका तारी ।। ९५ ।। कर्कश रूप सितेचे प्रथमाचे अम्लस्वभाव गोस्तैनिचे ॥ चंद्रावळिचरितानी क्षीर हि नीरस समग्र गोस्तनिचे ।। ९६ ।। क्षेण्यविगहित लोकी एकचि सकलंक चंद्रमा विधिने ।। जाणुनि चंद्रावळि ही जिली निर्दोष अब्द या विधिने ।। ९७ ॥ बहुत चरित्रे बहुतां कविनी केली तथापि या चरिती ।। गुणरसिकां पुरुषांचे अद्भुत श्रद्धादि भाव आचरिती ।। ९८ ॥ ६४ विटचौर्य शौर्यवोव्याली=जार कर्म, चोरी, शौर्य यांविषयोंच्या ओव्यांचा समूह. ६५ घोष गोकुळ. ६६ शतपत्रबंधु-सूर्य. ६७ राजीव कमल.६८ आभीरभीरु-गवळण. ६९ माकांत=कृष्ण. ७० दोषा-रात्र. ७१ निवेश घर. ७२ कांतार-वन. ७३ भाउक-भाविकभक्त. ७४ सिता खडी साखर. ७५ गोस्तनी द्राक्षा. ७६ गोस्तन-गाईचा स्तन, ७७ क्षेण्यविगर्हित क्षीणत्वामुळे निय. ७८ स्रजिली-निर्मिली.