पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०२) धुडिकुमार मोरेश्वरकृत थरकुनि सरकुनि पाहे परी मुकुंदै चहूं भुजी धरिली ।। निरखनि रागे गरकुनि बोले बरि खुण समग्र उद्धरिली ।। ७१॥ शिव शिव करुणामूर्ते सांबा मति घोर संकटी पडली ।। विपिना माजी निशिं या व्याघ्रकरी जैवि धेनु सांपडली ॥ ७२ ।। कृष्णा पुरविलि तृष्णा लावुनि माझ्या कलंक वंशाते ।। वंचाया कुलयुवती फिरसी स्वकरी धरूनि वंशातें ॥ ७३ ॥ आज्ञापावी तनु ते श्रीहरि हरिसुतनुता सुवास्तव्या ॥ स्थिरचर विश्वव्यापक मूर्ती जे हीच मानवा स्तव्या ।। ७४ ॥ भरतां मन्मथ देहीं सुरती तेही रती धरी दुपटा ।। निष्कपटा श्रीहरिसी विहरे गतवास कंचुकी दुपटा ।। ७५ ।। चतुरधिकाशिति बंधे करुनि मुकुंदे बृहत्तरा रजनी ।। रत केले परि कोणा न कळे तिलमात्रही विचार जनीं ।। ७६ ।। गोपि सकामा केली अतिशय निष्काम पूर्णकामाने ।। दीनोद्धरतनुसंगै युवती अपवर्ग कामुका माने ।। ७७ ॥ श्रीमछ्रीपतिहस्त-स्पर्शे गोपांगना सदाचरणी ।। राहुनि नटली कुटिला मति ते त्यागुनि सुखे सदाचरणी ।। ७८ ॥ सदसद्वस्तुविचारें चिन्मयपदलाभ जोडला सहजे ॥ अद्वयवाते उडती आनंदाधित तरंग त्या सह जे ॥ ७९ ॥ सुरतांती हृदयावरि ठेऊनि कर चीर सत्रपा हुडकी ।। वस्त्र न दे हे जाणुनि म्हणते हा नंदपत्र पाहुड की ।। ८० ॥ नम्र मुखें सखि विस्मित होउनि सुस्मित हरीस मागतसे ।। देई दयाळा लुगडे उघडे वपु नष्टकांति भासतसे ॥ ८१ ।। वास न दे तो कालिय-शासन ललना कृशानुसी दिसते ।। कुतुके बोले तिजला नाठविसी काय मानसीं दिस ते ॥ ८२ ।। सामर अमरावतिचे जेणे वैभव दिले शतक्रतुला । त्या प्रति नेणास म्हणसी नेदी दधि दुग्ध लेश तक तुला ।। ८३ ।। सर्व असो ते प्रस्तुत घडले हे मान्य कर्म योगाने ।। देउनि वसने माझी सुकृत तनू हो गृहोपयोगाने ॥ ८४ ।। त्या नंतर यदुराजे त्या व्रजभाजेस देउनि वासा ।। प्रेमे हृदयीं धरुनी इच्छित गमनासि देव नीवासा ।। ८५ ॥ ६० चतुराधिकाशि=चवन्यायशी आसनें. ( ही कामशास्त्रों प्रसिद्ध आहेत.) अनंगरंग दहावा भाग पहा ). ६१ अपवर्ग:मोक्ष. ६२ कालियशासन कृष्ण, ६३ कशानु-अग्नि.