पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चंद्रावळी-आख्यान. (२०१) अस्ता दिनमणि जातां जनार्दना तूं विवंचना रीते ।। उठवी भुक्तिसि जीची करणे सुरती विवंच नारी ते ।। ५६ ।। गोष्टि असो हे जाली भुक्तिचि तुझिया बहु त्वरा माते ।। म्हणुनि कराब्जी धरुनी ये निज सदनांत गोपरामा ते ॥ ५७ ।। बहुविध पक्वान्नोदन खीरहि लेह्यादि षड्से भरित ।। कटि पापड शाका कोशिबरि तिक्त फारसे भरित ॥ ५८ ॥ तिखटे विविध वरान्ने रुचिकर वडिया किसूनि कुष्मांड ।। जेवविते बहिणीते ते जरि आली करोनि कुष्मांड ।। ५९ ।। पंक्तिसि सारुनि भुक्ती बोलत युक्ती स्वकेलिगेहांत ।। स्वस्थ निजू वो सखये तेथ म्हणत धरुनि चाल गे हात ।। ६० ॥ रात्री राहुनि विपिनी रक्षिति पति साभिमान गे शाला ।। व्याघ्रबकादि ससेही जागृत चढउनि कमान गे शाला ।। ६१ ।। ऐकुनि वचने राही लीलासदनांत सत्वरा गेली ।। पूर्विल चंद्रावळिचे पाहुनि जे नामसत्व रागेली ॥ ६२ ।। सरस सुपारी चिकणी वीडया करुनी सुपक्क पानांच्या ।। भगिनीस देत जीच्या तृष्णा दिसताति ओष्टपानाच्या ।। ६३ ॥ विविध सुगंध द्रव्ये शय्या मदु गेह चित्र शालेचे ।। प्रौवर्ण हि ज्या स्थानी कॉर्पासान्वित विचित्र शालेचे ।। ६४ ।। सुखगोष्टी विमलांगी बसुनि पलंगी परस्परे करिती ॥ स्वस्खपतीची चरिते प्रणयाचरितें तशाच लोकरिती ।। ६५ ।। झोपिस जातां गोपी जगदाटोपी त्यजोनि वेषाते ।। जो पीनस्तनि वोपी कर अति सोपी करोनि योषा ते ।। ६६ ।। गाढालिंगन ओष्टग्रह कुचपीडा क्रमे रमाकांते ॥ सुरतारंभण केले वंचक मतिने मनोरमाकांते ॥ ६७ ॥ नि वन निज कांताचे मानुनि बाला खलदिरा पतिला ॥ राहि असे शेजारी पाहुनि विधि हा चढेल कोप तिला ।। ६८ ।। दुजिया संनिध रमतां दोष विशेषे अयोग्य हे करणे || त्यांतहि माझे बहिणी देखत अर्वाच्यता कशी करणे ।। ६९ ॥ सुरतायासे तरुणी जागत होउनि बरें विलोकी जों ।। हृदयावरी मुरलीधर रमतो व्रजवेष दाबि लोकी जो ।। ७० ।। ५३ करणे इंद्रियें. ५४ कुष्मांड कोहळा. ५५ केलि-कीडा. ५६ प्रावर्ण-पांघरूण ५. कापास कापूस. ५८ शाल-काश्मिरांतील लोकरीचे उत्तम वस्त्र. -५९ निधुवन-सन