पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२००) धुंडिकुमार मोरेश्वरकृत शिणली बाई म्हणउनि घडिघाड कुर्वाळुनी वरा ईते ।। घेत असे परि न कळे सुरवरऋषि मोहिनी बलाईते ॥ ४२ ॥ व्रतदानादिक सुकृते देव हि जाले वसुंधरे वरिले ।। तुज पहतां त्रिभुवनिचे वाटे साम्राज्य सुंदरी वरिले ॥ ४२ ।। अष्टावष्टसहस्रा असतां युवती करीत जो जारी ।। म्हणवी श्रेष्ठ नियंता खळजनहंता बहूत जोजारी ।। ४४ ।। तव वदने ऐकावी वाटे मनि कांतलोभवार्ता ते ॥ पुण्यश्लोका ललिता ऐकत सुख देति की भवार्ताते ।। ४३ ॥ श्रीवल्लभ तुजसंगें रतिविरतीते कसा धरी सांगे ।। अनुमत होउनि विवरी बहु दिन राहे प्रबुद्ध रीसां गे ।। ४५ ।। असती बहु जरि योषा तोषा मजविण नये सये हरिला ।। गर्व प्रमदावलिचा मजसी अनुरक्ततान्वये हरिला ॥ ४६ ॥ भामाप्रमुखा सवती शिकविति कुमती हरीस एकांती ।। परि अनुरागे माझ्या न दिसे अणु वक्रता सये कांती ।। ४७ ।। पडतां वदने जडली तत्पतिसुखकर कथावली श्रवणे ।। प्रेमोत्कर्षे हृदयीं चंद्रावळि बहु सुखावली श्रवणे ॥ ४८ ।। अतिशय अनुरागत्वे कौस्तुभपद्मादि उत्कटा ठेवी ।। हरि ठेवी मजपाशी कां करिसी या सये उठाठेवी ।। ५० ॥ प्रक्षाळुनि पदकमळा कमळाक्षी ते न लावितां उशिरा ।। शिशिरांबु प्राशविते एलाकर्पूर घोळुनी उशिरीं ।। ५१ ।। पाय धुतां पायाते पाहुनि पुसते स्वसस पर्याई ।। हरिपदपद्मिचिं चिन्हे दिसती तरिही कसीच पर्याई ।। ४९ ।। आंगीं लाउनि बाई लेप चमेली सुगंधरायाचा ।। ठेउनि वसर्ने व्हावे नाही संशय दुजा धरायाचा ।। ५२ ।। स्वकरें ग्रंथि खुणेची दिधली हरिने निरीस कंचूला ।। विघड पडे में त्यातें जाचिल मजला धरूनि कंचूला ।। ५३ ।। विंचरूनि वणि करितो हरि तो घनकांतिजिवेरां कशां ।। मृगमदतिलक ललाटी स्वकरें करिताति वक्र राकेशी ।। ५४ ।। वदती उत्तम हे की लोकी पतिचा निदेशै मानावा ।। त्यांत यशश्रीकीर्ती चढते सुषमा पराक्रमा नावा ।। ५५ ।। ४६ एला-वेलदोडा. ४७ उशिरा वाळा (पाण्यात घालण्याचा). १८ स्वसा=बहीण. ११ घनकांतिजित्वर काळे कुळकुळीत. ५० मगमद कस्तुरी. ५१ राकेश चंद्र. ५२ निदेश आज्ञा.