पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चंद्रावळी-आख्यान. अर्भक गगनफळाते रडतां श्रमले करोनि लोळणिसी ।। त्यापरि यत्न मृषा ते मज तूं करिसी समर्थ गौळणिसी ।। २७ ।। एक पदाही न पुरे त्या सुरवर्या फळे कसी जगती ।। रवि शशि तारागण हे मुष्टिंत अवघी धरील हे जग ती ।। २८ ।। विधि वर्जित पुरुषाते लाभेल किं काय खाणि परिसाची ।। दैवहता गुणहीना करिसी तृष्णा तया परी साची ॥ २९ ॥ नाना परि बडबडुनी मिरविसि लोकी मृषा सदा शीला ॥ परिसांची मी सदने बांधनि दिधली स्वदासदाशीला ।। ३० ।। ओत्रियशालांतरिंची अरणी कैसी मिळेल मातंगी ।। अथवा सिंहवधूसी संगम कैंचा घडेल मातंगों ॥ ३१ ॥ जगरक्षणयजी मी दीक्षित अध्वर्यु वीतिहोत्राही ।। नरसिंह मि तव वदने वदाविन हरि तूं आम्हांसि हो त्राही ।। ३२ ।। यापरि केशिनिहता या संकेतासि गोप-जायांते ।। बोलुनि सत्वर उठिला निजसदनाप्रति सगोप जायाते ।। ३३ ।। गोपाळे गोरक्षक संनिध बसउनि अनेकधा त्यांसी ॥ गोष्टी बऱ्या शिकविल्या सृष्टिक्रमयुक्ति तेवि धात्यासी ।। ३४ ।। मायामय ची तेची मी धरितो सांग जगत्सत्रा मा ।। रुचिराकति राहीची नुमजे ते व्यक्ति विशद सूत्रामा ।। ३५ ।। नटवेषाकृति योषा होउनि दास्यत्व अंगिकारावे ॥ सर्व हि अति सौंदर्ये भासति जीते तिला स्विकारावे ।। ३६ ।। सर्वाधीश निदेशे वनितावेघे शिशूतेती बजिंची ।। चंद्रावळिच्या मागे निघति अहंकृतिमंदोर्मि तीव्र जिची ।। ३७॥ श्रीमद्वष्णिकुलेशे सुंदर वरिल स्वरूप राहीचे ॥ लीलानिधिगीचे रत्न चि निर्मळ नवे पराईचे ॥ ३८ ॥ श्रीहरि चंद्रावळिच्या कृत्रिम वेशे गहा करी गमन ||" भगिनी-आश्लेषांची उत्कट धरितो स्पृहा करीगमन ।। ३९ ।। प्रेमालिंगन घडतां ठसली दृढताष्ट सात्विका भावी ।। चंद्रावळि भगिनीच्या मोहे ते मर्ति आत्मिका भावी ।। ४० ॥ ३१ मृषा व्यर्थ. ३५ विधिवर्जित दैवहीन. ३६ श्रोत्रिय अग्निहोत्री. ३७ अरणी समोध. ३८ मातंग अतिशूद्र. ३९ मातंग-हत्ती. ४० त्राही-रक्षण कर.११ सुनामा इद्र. ४२ तति समूह. ४३ ऊमी-लाटा, अतिशय. १४ आश्लेष-आलिंगन. ४५ करीगमन हत्तीसारखें चालणे आहे ज्याचे असा.