पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९८) धुंडिकुमार मोरेश्वरकृत अति मृदुला करवल्ली सल्लील हि जी सनाल की कमळे । अद्भुत वदनश्रीची सुषमा जो पाहतां मृगांक मळे ।। १३ ।। विद्रुम भंगाचे परि शोभे अधरोष्ट्र नासिका सरला ॥ तिलसुम शुकचंचूचा पाहुनि मदगर्व सर्व ओसरला ।। १४ ।। सर्वोत्कृष्ट विराजे चपलायत दृष्टि ते निकी लाली । लज्जित शैतपत्रश्री मज्मन करिते गभीर कीलाली ॥ १५ ॥ यापरि सौंदर्याची सीमा कयितां हरि त्वरें उठिला ।। खंडिन गर्व तियेचा दाखवि मजला कुठे उभी कुटिला |॥ १६ ॥ पेंधा श्रीकृष्णाने दाखवि दुरुनी सगोरसा महिली ।। जीच्या सौंदर्याते साम्यचि न मिळे सँसागरा माहला ॥ १७ ॥ चंद्रावळिच्या रूपा पाहुनि इच्छी हरी मनी सुरता || ते क्षणिं मूच्छित होउनि देवहि दवडी समन तो सुरता ।। १८ ।। ऐशा मतिने यदुकुलभूषण तेव्हां सर्वे किशोराँसी ।। घेउनि गोपस्त्रीला मागत दधि दुग्ध तो यशोरासी ॥ १९ ॥ मस्तुमि निजवस्तुसि याचित निस्तुलगुणी स्त्रियांजवळी ॥ कस्तुरिलिप्त-स्तनिंचा चित्तें [हरुनी?] हरी समाज वळी ।। २० ।। शपथपुरःसर करिसी जरि तूं संकल्प देहदानाचा ॥ तरिच घडेल सुकत बहु नातरि यापरि धना सदा नाचा ।। २१ ।। बोलुनि मिथ्या पदरी दुष्कृत कां व्यर्थ घेसि वाचाळा ।। ठकविसि गोकुळतरुणी या तो स्थळिं सोड सर्व ही चाळा ।। २२ ॥ . नायिकसी चंद्रावळि जरि साधुत्वे मदुक्ति या परमा । दाविन जनदृष्टीसी निरसुनि चैला दिगंबरा परमा ॥ २३ ॥ सर सर परता दुष्टा क्लिष्ट न बोले वरिष्ट मी जाया । काय वदं तुजसंगे पशुपा तटले निजाश्रमी जाया ।। २४ ॥ दुर्धर सर्पिणि देहा स्पर्शिल हस्तानि कोण सो भलता ।। रक्षक असतां विपिनों रंका लाभेल केवि पुष्पलता ॥ २५ ॥ गरुडध्वजगारुडिया भारुड हे तूं किमर्थ दाखविसी ।। तुजविषयी मी न ढळे पंचाक्षरिमंत्र ज्या सदा खेविसी ।। २६ ।। १९ सुषमा शोभा. २० मृगांक-चंद्र. २१ विट्ठम-पोवळे. २२ शुक-पोपट. २३ शतपत्र -कमल. २४ कीलाल -पाणी. २५ महिला स्त्री. २६ ससागरामहिला-समद्रवलयांकित पृथ्वी. २७ सुरता-देवपणा. २८ किशोर-मुलगे. २९ मस्तु-लोणी. ३० निस्तुलगुणी निरुपम आहेत गुण ज्याचे असा. ३१ चैल-वस्त्र. ३२ विपिन वन. ३३ खविसी जखीण.