पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धुंडिकुमार मोरेश्वरकृत चंद्रावळी-आख्यान. कुटिलो विमला मतिने वंचितसे जो ब्रेजांत जायांतें । नमुं त्या श्रीहरिचरणा दुर्धर संसार बनिन जायाते॥ १ ॥ श्रवणी वंशी वंशिध्वनि संचरतां स्मरोनि कुंजाते ।। युवतिजन चालिला त्या सुरभिसमयसमलता निकुंजाते ।। २ ॥ त्या एकसरे उठल्या वाटति गोकुलधनांतुनी चपला ॥ किंवा व्रजकुंडांतुनि निघति स्मरवन्हिच्या शिखीं चंपला ॥ ३ ॥ वस्त्र गृहाहान सर्वहि गोरसविक्रय करावया रमणी । निघतां सत्वर मार्गी पाहति सहसा मुकुंद जारमणी ॥ ४ ॥ गोपावृत गोपाळा पाहुनि गोपी सशंक चालाया ।। होउनि काय करावे म्हणती पशुपाळका कुचाळा या ।। ५ ॥ चंद्रावळि या नावें मुखरिण गोपी बहीण रोहीची ।। धीट सुरूपा चतुरा संगति अवध्या दृढा धरा ईची ॥ ६ ॥ या परि निश्चय करनी चालति मागें समस्त ही वनिता ॥ वनि तांडव करि खांडव-रिपुचा सारथिहि आत्म जनिता ॥ ७ ॥ तो पथिं पेंधाप्रमुखा धांवति शिशु मुररिपू दयालु गडी ॥ अवरोधुनि तरुणीजन झोबात अर्वाच्य फेडुनी लुगडी ॥ ८॥ सरकुनि चंद्रावळिने पेंधा बडवुनि सवेग टाळीला ।। स्फुदत स्फुदत सांगे हरि चल आणूं तये खटाळीला ॥९॥ अतिरूप सवय यांनी मानी तणतच्छ ऊर्वशी रंभा ॥ हंसगती पदिं चमके गमती नमिताति ऊर्वशी रंभा ।। १० ॥ सूच्यग्रा परि मुळिंचा खंडित दिसतो वलित्रया माँज ॥ विश्रुत मदनास तशा जपुनि चला हरि हरी तिचा माज ॥ ११ ॥ पीनोन्नत कुच वर्तुल स्मरदुर्जयदुर्गयुग्मसे दिसती ।। तनुवाङ्मन आति चंचल म्हणवी कुटिलिका अनादि सती ॥ १२ ।। १ चंद्रावळी राधेची बहोण. २ कुटिला कपटी. ३ बज गोकुल. बजिन=पाप, मल. ५ वंशिध्वनि=मुरलीरव. ६ सुरभिसमय-वसंतकाळ. ७ चपला=विद्युल्लता. ८ शिखा= ज्वाळा.९ चपला-चापल्य युक्ता. १० राही-राधी (राधा). ११ खांडवरिपु अर्जुन. १२ आत्मभजनिता ब्रह्मदेवाचा बाप ( कृष्ण ). १३ माज-कंबर. १४ माज-उर्मटपणा. १५ पीनोन्नत=पुष्ट व उच. १६ कुच-स्तन १७ स्मर मदन.१८ कुटिलालका-कुरळकेशी.