पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चिंतामणि विरचित्त सीतास्वयंवर. राम ह्मणे धनु मोडे मत्करयोगे स्वये च किडके की । नसतां मत वदाया गरुडा ही धरिल काय भिड केकी॥५॥ रे भंगिलेस रामा स्व्यर्थ शिवधनू न ते अघ स्मरतां ।। परि जाण म्यां न धरिली अजुनी क्षत्रियकुली अघस्मरता ।। ८६ ।। राम बदे ते च न या द्विजभंगद शक्ति भार्गवा रामी ।। होइल ते हो हा तव परशूद्भुत भुजगमार्ग वारा मी ।। ८७ ।। मग मुनि बोले कोपुनि घे नव मच्चाप राम हा मोड ।। मग तुज ह्मणेन राघव कुलांत रिपुवातसह महा मो. ॥ ८ ॥ मग ते हि धनू चढवुनि दावाया राघव प्रताप सतां ।। ईशत्व हरी मग तो अवलंबी अगुज विप्र तापसता ।। ८९॥ मग तो निर्विघ्नपणे सवधू श्रीराम पावला गांवा ।। गावा ध्यावा वाटे हाचि मला सत्स्वभाव लागावा ।। ९० ॥ इति श्रीज्योतिर्विद्राजजीवसनु चिंतामणिविरचितः सीतास्वयंवरः समाप्तः ।। ६८. मंतु अपराध, ६९. केको मोर. ७०. घस्मरता घातुकपणा, ७१. मोड=अंकुर.