पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सीतास्वयंवर. (१९५ वांकवि वैरिमुखासह कीर्तिसह हि त्या गुणास मग जोडी । वोडी सीता चित्तासह भृगुजाहंकृतीसहित मोडी ।। ७१ ।। होतां भंग धनूचा कडकड भीम ध्वनी जगी पसरे ।। घसरे रविरथ विसरे रामजपा जानकी वरूं हि सरे ।। ७२ ।। मिटले डोळे किटले कान जगाचे समुद्र हि अटले ।। तुटले नभ [?] तो फुटले ब्रम्हांड भये झरे नगा सुटले ।। ७३ ।। भ्याले दिग्गज बोले नभ मेले भीरु भूमितल डोले ।। सोले अहिशिर न्हाले घर्मभरे लोकपति भया ल्याले ।। ७४ ।। विधि मातृहिसकाच्या शिवले तें बहुत हस्तराजीवा ।। शुध्यर्थ म्हणान वाटे रामकरी करुनि दे त्वरा जीवा ।। ७५ ॥ वधिले तद्योगें बहु नृप रामें करुनि जित्वराजीवा ।। शुध्द्यर्थ म्हणुनि वाटे रामकरी करुनि दे त्वरा जीवा ।। ७६ ॥ आता पण सिद्धिस तो नृप कौशल्यादि सर्व ज्या माता ॥ अणवि दशरथा ही की हो राघव शास्त्रपूर्व जामाता ।। ७७ ।। मग आनंदें जनक स्वसुतेचा सविधि हो विवाह करी ॥ ते वाटले समस्तां पडली साक्षाद्रमा विवाह करीं ॥ ७८ ॥ जातां विवाह अटपुनि राम स्वपुरास होय हो अडवा ।। कंडवा बहु तो भार्गव नृपकुलजलधीस मूर्त जो वडवा ।। ७९ ॥ तैं रामाते सूचवि लक्ष्मण ते कार्तवीर्यबाहु तरू ।। झाले यत्परशुदवी दशशत ही त्वरित जेवि बा हुत ॥ ८ ॥ वधितां जेवि हरीने पति कांपति बहु करेणु कापोत || तेंवि नृपस्त्री म्हणुनी झाला जो एक रेणुकापोत ।। ८१ ॥ मेणे रुधिरक्षालित केलि करुनि भूमिभृगण कुठार ॥ ज्याचा च ख्यात जगी एक नृपति शोणितारण कुठार ।। ८२ ॥ तो हा गुरुधन्ववधक्षुभितमना पातला असे वाटे ।। जमदग्निसूनु तरि त्या साधु वचे लाव राघवा वाटे ।। ८३ ।। तो भंज्यद्ध सरवरुष्ट वदे भार्गवर्षि रामाते ।। वरिली कोणी शिवधनु मोडुनि भा वर्गवर्षि रामा ते ॥ ८४ ॥ ५८. भृगुजाहंकृति-परशुरामगवं. ५९. मातृहिंसक आईला मारणारा ( परशुराम ). ६०. राजीव कमल. ६१. विवाह विष्णु (गरुडवाहन). ६२. वडवा वडवाग्नि. ६३. रू कापूस, ६४. करेणुकापोत हत्तिणीचे बच्चे. ६५, कु-पृथ्वी. ६६. शोणित-रक्त. ६७, भंजद्धनुरारवरुष्ट मोडलेल्या धनुष्याचे आवाजाने रागावलेला.