पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सीतास्वयंवर. (१९३) तो कथिले घ्या हे शिवधनु सगुण हि भूपजन करा ज्याने ।। करिजेल तद्वधू ही सीता हे स्पष्ट जनकराजाने ।। ४२ ।। ऐकुनि ते वच पाहुन चंड हि कोदंड नृप विचारांत ।। पडले किति किति म्हणती जाउं पळुन तरि असे दिन न रात ।। ४३ ।। किति बदति अह्मा बांधुनि सीतावरणोत्सवे न दाव्याने ।। अणिले इथे हराया तेज कशाचा विवाह दाव्याने ॥ १४ ॥ थकले ज्यास अणाया अनेक हस्त्यश्ववषमकासर हा ।। ते धनु सज्य कराया नृप हो कसतां कशास कास रहा ।। ४५॥ सीतामिष करुनि पुढे घालू पाहे धनुष्यभंग गळां ।। प्राण हराया कळला जनकाचा बेत हा अह्मां सगळा ।। ४६ ।। किति बदती सीतेस्तव काय म्हणुन हे धनू सजा उचला ।। पडली न वोस पृथ्वी मिळल दुजी स्त्री पुरास जाउं चला ।। ४७ ।। तो रावण माशीरस्थित वाद्यनाम कडकडा गाजे ।। तैं दचकले नृप तसे पशु हि न ते प्राप्त कडक डागा जे ॥४८॥ अभिमुख जावुनि मग त्या बसविले अणुनि यातुरायास ।। सत्कारुनि हि नृप ह्मणे हार तसा लावू या तुरा यास ।। ४९ ॥ पडतां दृष्टि अकस्मात् दशवदनाचा विरूप काय महा ।। पळती दडती मानुनि सीतेसह सर्व बायका यम हा ॥ ५० ॥ मग तद्गुरू वदे हा सीतार्थ अला स्वये च दे यास ।। जोड नृपा सख्य सुता कोणास तरी हवी च देयास ।। ५१ ।। परि जनकें सूचवितां मंत्रिमुखें ज्याधिरोप दशवदने । करुनि स्मये हि विस्मय केली प्रो फुल्लगल्ल दश वदने ।। ५२ ।। बोले जनका न कसी मत्कीर्ति अली श्रुतीत सुरसा रे ।। की घातले दशमुखें जिंकुनि कारागृहांत सुर सारे ।। ५३ ।। म्यां तो शैल उचचिला सेश्वर ही भूप जो नंगामाजी ।। मग या न कांबटावर शक्ति नृपा चढल काय गा माजी ।। ५४ ।। अणि सांगतो नृपा हे धनु गुरुचे शंभुचे जरी नसते ।। तरि म्यां मघां च उचलुनि मोडुन ही टाकिले किं रे असते ॥ ५५ ॥ मग नृप वदे हंसुनि तुज आली येथे च रावणा शंका ।। गुर्वपमानाचि नगोद्धारिं न वदतोस काय निःशंका ।। ५६ ।। ४३. कासर रेडा, टोणगा..?. ग्राम-समूह. १५. यातु-राक्षस. ४६. स्मय हसणे. ४७. नग-पर्वत.