पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९२) चिंतामणि विरचित हा शौर्योदार्यश्रीसदन मदनसा कलिंगनवराजा ।। सत्वर वर हा च दिसे सीते तुज योग्यसंग नवरा जा ॥ २८ ॥ हा तरि पहा सुलक्षणशौर्यनिधी नाथ वंगवसँधेचा ।। हाच तुझा भोग करो एक जसा देवपुंगव सुधेचा ।। २९ ॥ हा तैलंगमहीपति ज्याच्या राज्यांत विप्र ताकास ॥ प्राशुनि राखिति अमृतद सुरेभीची जेवि विप्रता कास ।। ३० ।। तो दावितो पहा वर साहानि भूपाल अंगदें शाला ॥ याते वरूनि सीते शाश्वत तं पाल अंगदेशाला ।। ३१ ।। तो निषधनाथ सोते जो झेलितसे महीप हारमणी ।। याची हो तूं हा ची येक जगी रिऍमहीपहा रमणी ॥ ३२ ।। हा काश्मीरमहीपति ज्याची पिळदार परम ही पगडी ।। वक्र तुला हा च दिसे योग्य सये विजितपरमहीप गडी ।। ३३ ।। किंचिद्वक्रितकंधर सखि तो च नरेंद्र मालवा वाहे || मन्मन याजवळ तुझा हीनें मुखचंद्रमा लवावा हे ।। ३४ ।। केरलभूप पहा सखि बसलासे धरूनि तो कठार करी ।। जो बाल्यीं च रिपुगणा करिस जसा सिंहतोक ठार करी ।। ३५ ॥ या परि नाना भूपां दावुनि मग ते रघूत्तमा दावी ।। तैं सीतेचे किंचित् हीने आंत चि मखाज मोदा वी ।। ३६ ॥ किति मधुर पहा दिसतो सीते वीरासनस्थ हा राम । धामनिधि श्यामतनु क्षाम नसे कामसा महाराम ।। ३७ ॥ कुंडलमंडितगंड श्रीखंडक्षोदलिप्त भुजदंड ।। चंडद्युतिकुलमंडन शोभवि यत्तनु अखंड कोदंड ।। ३८ ।। भूप त्वदर्थ सारे वहति मनी जरि वहोत देवाचे ।। ध्यान परी मन्मानस याचे नि तुझे च होतदेवाचे ।। ३९ ।। सीता वदे मला ही रुचला राघव शरत्सुधीकर हा ॥ परि हे तातपणस्मृतिसवत वदे दाखऊन धाक रहा ।। ४० ।। अतिमधुरमृदुलतनु हा रघुनंदन वचसार हे चाप ।। उचली कसा अशा गे कां फसला घालुनी पणा बाप ।। ४१ ।। ३३. वंगवसुधा बंगाल प्रांत. ३१. देवपुंगव-देवश्रेष्ठ. ३५. सुरभी गाय, ३६. अंगदें बाहु भूषणे. ३७. शाल-शालजोडी, ३८. रिपमहीपहा शत्रुनाशक. ३९. विजितपरमहाप-जिकिले आहेत शत्रुरूपी राजे ज्यानें.४०. श्रीखंड क्षोदलिप्तचंदनाची पूड ज्याला चोपडली आहे असा. ४१. चंडद्युतिकुलमंडन-भूर्यवंशभूषण. १२. सुधाकर चंद्र.