पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सीतास्वयंवर. (१९१) त्याला च हे सुत नृपा बाप असे मानिती दशरथा रे ॥ १४ ॥ नामे करूनि बापा सगुणसौजन्यधाम हा राम ।। हा लक्ष्मण दोघेही शौर्यश्रीचे नृपा महाराम ॥ १५ ॥ येणे चि पूर्ण केला मद्यज्ञ वधूनियां त्वनीक वनी ॥ याच्या च सतत रिझला भूपा वल्माकभू मुनी कवनी ।। १६ ।। याच्या च मार्गणी ती भूपा सत्कारि ताटका असुनी ।। पावे सद्गति की ते पावति दुर्गति न देति जे असुनी ॥ १७ ॥ येणें सुबाहु वधिला हे तरि किति शौर्य रामरायाचे ॥ एतत्करे च सर्व हि राक्षसगण भूवरा मरायाचे ।। १८ ।। जे स्त्री होय शिला तें कौशल याच्या च बा पदरजाचें ।। हा तो च नृपा धरितो धननादाचा हि बाप दैरै ज्याचें ॥ १९ ॥ भूपवरा हे आले स्वयंवरमहोत्सवा पहायास ।। न कळे बाल्ये दुष्कर की सुकर ज्याधिरोप हा यास ।। २० ।। मग तो शौर्य श्रीधर अवडे रघुराज तेंवि जनकमना ।। देश जसा ज्यांत स्त्री वररूपा राजते विजन कैमना ।। २१ ॥ बहुवार रघुवरा मग पाहे वर्णनि मनांत ही अपणा ॥ निंदी जनक स्मरुनी अविचारकृतेशधेन्वभंगपणा ॥ २२ ॥ मग आदरें बसविला सभेत कौशिक सशिष्य सर्षिगण ।। ते तीत शोभती ते रविशशिसे भास्करान्वयाभरण ।। २३ ॥ गुरुसह सभेत येउनि बसतां सूर्यान्ववायहीरमणी ।। म्हणात मनी भूप दुज्या लभ्य न रामाशिवाय ही रमणी ॥ २४ ॥ तैं येक सखी वर्णनि गुण भूपां दाखवी धैरीजेते ।। ते ऐकुनि तोषविती चित्ता क्षणमात्र विविध राजे ते ।। २५ ।। हा तूं पहा महा गे गुणशाली गुर्जरोवनीप कधी ।। न त्यजुन यास सीते विषय करी निर्जरीवनीपकधी ॥ २६ ॥ यदंडभये परधनवस्त्रा न शिवोन वायु वावरतो ॥ जो नाथ अवंतीचा रुचल तरी गे नवा युवा वर तो ।। २७ ॥ १६ महाराम-मोठे बाग. १७. वल्मीकभू वाल्मिकी. १८. मार्गणबाण. १९. अस= प्राण. २०. घननाद मेघनाद (रावणाचा पुत्र) २१. वर भोति. २२. ज्याधिरोप धनण्याला दोरी लावणे. २३. विजन एकांत. २४. कमना सुदर.- २५. ईशधन्वभंगपणशिवाचे धनुष्य मोडण्याचा पण. २६. अन्वय-कुळ, वंश. २७. अन्ववाय-वंश. २८. धराजा-सीता. २९. गुर्जरावनोप-गुजराथचा राजा. ३०. निर्जरावनीपकधी इंद्राचे मन.३१ अवंती उज्जनी सभोवतालचा मुलूख. ३२. युवा-तरणा.